आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील दीड लाख ऊसतोडणी मजूर संपात सहभागी , राज्यातील 18 लाख ऊसतोड मजूर संपावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उसतोडणी कामगारांच्या मजुरीच्या दरात वाढ करावी, यामागणीसाठी राज्यातील 18 लाख ऊसतोड मजुरांनी शुक्रवारपासून (25 जुलै) संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सुमारे दीड लाख मजूर सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेडसह राज्यातील बीड, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद या जिल्ह्यांत सुमारे 18 लाख ऊसतोड मजूर आहेत. साखर संघ व ऊस तोडणी कामगार संघ यांच्यात 15 ऑक्टोबर 2011 मध्ये करार झाला होता. या कराराची मुदत संपली आहे. सध्या महागाई मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कारखानदार मजुरांना जो दर देत आहे. तो परवडत नाही. या दरात दुप्पट वाढ करावी, वाहतुकीच्या दरात वाढ करावी, मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी, पद्र्मशी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊस तोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची करारात ठरल्याप्रमाणे अमंलबजावणी करावी, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्याच भागात निवासी आश्रमशाळा सुरू कारव्या, नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेला ऊस तोडणी कामगार उन्नती प्रकल्प राज्यात राबवावा, शासनाच्या निधीतून कामगारांना घरकुल द्यावे, यामागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनतर्फे शुक्रवारपासून संप सुरू करण्यात आला आहे. युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू करण्यात आला आहे. राज्यातील 18 लाख ऊसतोड मजूर या संपात सहभागी झाले आहेत.
सरकार गरिबांचे की मोठय़ांचे
राज्य शासन ऊसतोडणीचे मशीन घेण्यासाठी 50 लाखांचे अनुदान देते. मात्र ऊसतोड मजुरांच्या विम्याची रक्कम भरण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत. ही शोकांतिका आहे. हे सरकार गरीबांचे आहे की मोठय़ा बागायतदारांचे आहे.ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करावी, यासाठी हा संप करण्यात आला आहे.राज्यातील 18 लाख ऊसतोड मजूर या संपात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत शासन मागणीची पुर्तता करता नाही, तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही.’’ गहिनीनाथ थोरे पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र उस तोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन.