आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- गुरुमाउली पतसंस्थेचे व्यवस्थापक गणेश शेजूळ (बेलापूर) यांनी कौटुंबिक वादातून पतसंस्थेच्या शिवाजी रस्त्यावरील कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्युपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या पत्नीच्या माहेरच्या 12 नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश यांचा बेलापूर येथील जयर्शी व राजेंद्र पवार या शिक्षक दाम्पत्याच्या मुलीशी प्रेमविवाह झाला. मात्र, तिचे आई-वडील व माहेरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. लग्नानंतर गणेश यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हाही दाखल होता. लग्नानंतर माहेरी गेलेली गणेश यांची पत्नी पुन्हा सासरी आलीच नाही. चिठ्ठीत गणेश यांनी म्हटले आहे की, आपल्या पत्नीचा काहीही दोष नसून तिच्या माहेरच्या लोकांच्या दबावाला ती बळी पडली. तिला घटस्फोट देण्यासाठी सासरच्या लोकांनी आपल्याला धमक्या दिल्या. त्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत. सोमवारी रात्री गणेश पतसंस्थेच्या कार्यालयात आले. पंख्याच्या हुकला दोरी अडकवून त्यांनी गळफास घेतला.