आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंगाच्या फिर्यादीत नाव आल्यामुळे कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पीडित महिलेने विनयभंगाच्या फिर्यादीत आरोपी म्हणून नाव घेतल्याचे समजताच एकाने पोलिस ठाण्याच्या आवारात लोखंडी खांबावर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडला. अंतोन श्यामसुंदर गायकवाड (नवनागापूर) असे या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. एमआयडीसी परिसरात दोन गटांत वाद झाले होते. परस्परविरोधी फिर्यादी देण्यासाठी ते पोलिस ठाण्यात गेले. यावेळी गायकवाडही तेथे होता. पीडित महिलेने विनयभंगाची तक्रार दिली. फिर्यादीत आपले नाव असल्याचे समजल्यावर गायकवाडने लोखंडी खांबावर डोके आपटून घेतले.
बातम्या आणखी आहेत...