आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. मनीषा दत्तात्रय गोरे (३८, केडगाव) हे विवाहितेचे नाव आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने मंगळवारी आत्महत्या केली. राजेश भीमराव एकाडे यांनी शुक्रवारी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली. मनीषाचा नवरा दत्तात्रय तुकाराम गोरे, दीर संजय तुकाराम गोरे, नणंद शोभा पंडित खरपुडे तिचा मुलगा नीलेश पंडित खरपुडे (रा. माळीवाडा) यांनी तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली. तिचा शारीरिक मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.