आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस मुख्यालयात पोलिसाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पोलिस मुख्यालयात रहात असलेल्या एका पोलिसाच्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूनम अनिल गिरीगोसावी (वय ३०) असे या महिलेचे नाव आहे. त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लिपिक होत्या. त्यांचे पती सुपे पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहेत. 

पूनम गिरीगोसावी काही वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या. उपचारांसाठी मोठा खर्च करूनही त्यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे काही दिवसांपासून त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी त्याचे पती कामावर गेले होते. रात्री पोलीस ठाण्यात काम असल्यामुळे ते घरी आले नाहीत. बुधवारी सकाळी पूनम यांनी राहत्या घरात छताला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या काही महिलांनी पाहिला. त्यानंतर पोलिस मुख्यालयात एकच गोंधळ उडाला. 

पोलिस मुख्यालयाचे आरपीआय यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत ही बाब गृह अधीक्षकांना कळवली. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण वाखारे यांनी पंचनामा केला. पूनम यांची आई, भाऊ, पती यांना बोलावून त्यांचे जबाब घेण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...