आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन उन्हाळ्यात जिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्षास टाळे; रुग्ण त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्याने उष्मघातांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.उष्मघातांच्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वंतत्रपणे उष्णघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, हा कक्षाला मागील दोन दिवसांपासून टाळे लागलेले आहे. त्यामुळे उष्णघातांच्या संशयित रुग्णांना खाली हाताने परतावे लागत आहे.

नगर शहरातील तापमानाचा पारा 43 अशांवर गेला आहे.शहरात व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे उष्मघाताचे रुग्णही मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना अल्पदरात उष्मघातावरील उपचार अल्पदरात मिळावेत. यासाठी जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे.

मात्र या कक्षालाच टाळे लावण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात कमी दरात उपचार मिळतात म्हणून शहरासह ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात रुग्ण जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, रुग्णालयात आल्यानंतर या रुग्णांची हेळसांड होते.

.. तरच कक्ष उघडतो
उष्माघात कक्षात वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली,त्यामुळे हा कक्ष बंद ठेवण्यात येतो. रुग्ण आल्यावर कक्ष उघडण्यात येतो.’’ रवींद्र निटूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक