आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाची तीव्रता वाढल्याने बर्फाच्या दरात दीडपट वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फळांचा ज्यूस, उसाचा रस, लिंबूसरबत, ताक, आईस्क्रिम, तसेच कोल्ड्रींकसाठी लागणाऱ्या बर्फाचे भडकले आहेत. उन्हाचा पारा चढल्याने बर्फाच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे थंडपेय विक्रेत्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. बर्फ महागला असला, तरी थंडपेयांचे दर मात्र अद्याप स्थिर आहेत. परंतु एप्रिलअखेर दरवाढ होण्याची शक्यता अाहे.
बर्फ तयार करणारे चार कारखाने शहरात आहेत. रोज सुमारे एक हजार बर्फाच्या लाद्या तयार केल्या जातात. त्यातील दोनशे लाद्या शहरासाठी, तर उर्वरित लाद्यांचा पुरवठा जिल्ह्यात केला जातो. शंभर किलोची एक लादी २८० रुपयांत पोहोच केली जाते. एप्रिलअखेर एका लादीची किंमत ३०० ते ३२५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

सध्या बर्फाचे दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले असले, तरी थंडपेयांच्या किंमती मात्र स्थिर आहेत. अवकाळी पावसामुळे मार्च महिन्यात थंडपेयांचा व्यवसाय थंड होता. परंतु मार्चअखेर उन्हाचा पारा चढल्याने हा व्यवसाय चांगलाच तेजीत आला आहे. बर्फाचे दर आणखी वाढल्यास थंडपेयांच्या किंमतीदेखील काही प्रमाणात वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, शुद्ध बर्फाचाच वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.