आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supporting Dhangar Community Reservation, Sharad Pawar Confess

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करू, शरद पवार यांची ग्वाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजास आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन अण्णा डांगे यांनी दिल्लीत यावे. संबंधित मंत्र्यांशी त्यांची भेट घडवून आणू, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी दिले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिल्पसृष्टीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली. पवारांनी आपल्या भाषणात पाणी व इतर प्रश्नांवर बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा लोकांनी आरक्षणावर बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी धनगर समाज आरक्षणाची मागणी पूर्ण होण्यासाठी सर्व जबाबदारी मी घेतो, असे सांगत पवार यांनी आरक्षणाबरोबरच पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत भाषण आटोपते घेतले.