आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी छळ प्रकरणात आरोपींना होणार अटक, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यायाधारसंस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात महिलांच्या हक्कासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर पहिल्या सुनावणीत महिलेचा हुंड्यासाठी छळ झाल्यास आरोपींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. महिलांच्या हक्काला बाधा येत असल्याने केंद्र सरकार, राष्ट्रीय महिला आयोग, महिला बालविकास विभागला नोटीस काढून २८ दिवसांत म्हणणे मागितले, अशी अॅड. निर्मला चौधरी यांनी दिली.
 
न्यायाधार संस्थेच्या वतीने एक महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात संस्थेच्या सचिव अॅड. निर्मला चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली. महिलांची सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणारी पिळवणूक, छळ, अत्याचार प्रकरणाची आकडेवारी संस्थेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचुड यांनी सुनावणीत हुंडाबळी कायद्यान्वये आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...