आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठलाची उपमा देत साहेबांना पाचपुतेंनी धोका दिला : सुप्रिया सुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- माझ्या वडिलांना विठ्ठलाची उपमा देणाऱ्या बबनराव पाचपुते यांनी साहेबांना त्यांच्या अडचणीच्या काळात धोका दिला. अशावर विश्वास कसा ठेवायचा, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुतेंवर जोरदार हल्ला चढवला. 

मांडवगण येथे मंगळवारी सुळे यांची राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ सभा झाली. ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, राहुल जगताप, तसेच सचिन जगताप, सिद्धेश्वर देशमुख, सुवर्णा जगताप, सुवर्णा कोतकर, ऋषिकेश गायकवाड यांसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नेते उपस्थित होते. 

अतिशय संयमी शब्दांत भाषण करताना सुळे या पाचपुतेंच्या संदर्भ आला की आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांना ते विठ्ठल म्हणत. आम्ही पंढरीला अधूनमधून जातो. देवधर्म करतो, परंतू एका मर्यादेत. विठ्ठलावर आमचा विश्वास आहे. मात्र, ज्यांनी विठ्ठलाप्रमाणे माझ्या वडिलांवर विश्वास दर्शवला, त्यांनी अडचणीच्या वेळी त्यांना धोका दिला. अशा माणसावर कसा विश्वास ठेवायचा? 

मी कोणाच्या वाटेला जात नाही असं सांगून खासदार सुळे म्हणाल्या, माझ्या वडिलांबरोबर ज्यांनी काम केले ते आज कोठेही असले तरी मी अशा लोकांचा आदर करते. चांगल्या वाईट काळात ज्यांनी साथ दिली त्यांच्याविषयी मी बोलत नाही. परंतु परवा दादा (अजित पवार) इथं आला. त्याच्या भाषणाला तुम्ही (पाचपुतेंनी) प्रत्युत्तर दिले. माझ्या दादाबद्दल बोलला तर मी ऐकून घेणार नाही. आमचं नाव घेतल्याशिवाय काहींना माध्यमांत हेडलाईन मिळत नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत फेकू... 
नोटबंदीकाकेली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावी. २०० लोक लाईनीत उभे राहून शहीद झाले. लोकांना वाटले नोटबंदी नंतरच्या मोदींच्या भाषणात खात्यावर निदान पाच लाख रुपये येतील. त्यांचा भ्रमनिरास झाला. ‘जमलो की सरकार’ असे यांना दिल्लीत म्हणतात. गुगलवर सर्च करताना ‘फेकू’ शब्द टाईप केला, तर कोणाचे नाव येते हे लोकांनी पाहिले आहे. मोदी हे फेकू आहेत. दिलेली आश्वासने पाळत नाही. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र दळेंद्र अशी सर्व ‘द्र’ काढू टाकण्याची वेळ आली आहे.
- सुप्रियासुळे, खासदार, राष्ट्रवादी. 
बातम्या आणखी आहेत...