आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 सूर्यनमस्कार करा, चिरतरुण राहा- डॉ. दिलीप सारडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कुठलाच आजार नाही, शारीरिक तपासण्यांचे रिपोर्टही नॉर्मल म्हणून मला व्यायामाची गरज नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. सामान्यपणे स्वस्थ दिसणारी व्यक्ती त्याची क्षमता, ताकद व लवचिकतेमध्ये कमी पडते. त्यासाठी दररोज 21 सूर्यनमस्कारांसह व्यायाम करून चिरतरुण राहा, असा सल्ला डॉ. दिलीप सारडा यांनी दिला.
मुनोत ट्रस्ट व पी. एम. शहा फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या उपक्रमात ते बोलत होते. या वेळी रमेश फिरोदिया, इमरतबाई मुनोत, व्ही. ए. दोशी उपस्थित होते.
डॉ. सारडा म्हणाले, ज्यांच्याकडे व्यायामाला वेळ नाही, त्याच्या आयुष्याची वेळ लवकरच संपेल. दररोज व्यायामाला वेळ देणे आवश्यक आहे. स्वत:च्या र्मयादा ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेला व्यायाम लाभदायी ठरतो.सूत्रसंचालन शरद मुनोत यांनी केले. रमणलाल मेहेर यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. स्वागत डॉ. सुरेखा घुगरिया यांनी केले.