आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णा काळे हिची सुवर्णपदकाला गवसणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न्यू आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुवर्णा भगवान काळे हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दत्तात्रेय महादेव आलेगावकर सुवर्णपदक पटकावले. मे २०१४ मध्ये झालेल्या एम. ए. हिंदीच्या अंतिम परीक्षेत ती विद्यापीठात अव्वल ठरली.

देहरे या ग्रामीण भागात शिक्षणाचा कोणताही वारसा नसताना सुवर्णाने ही कामगिरी केली. मे २०१४ मध्ये एम. ए. हिंदीच्या परीक्षेत विद्यापीठात सर्वाधिक गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली. विद्यापीठाने यासंदर्भात पाठवलेले पत्र नुकतेच तिला मिळाले. येत्या पदवीदान समारंभात तिला सन्मानपूर्वक सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. महाविद्यालयाचा हिंदी विभाग ग्रंथालयाच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवता आल्याचे तिने सांगितले. प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, हिंदी विभागप्रमुख डॉ. सुरेश बाबर, सुनीता मोटे, हनुमंत जगताप, अशोक गायकवाड, नयना कराळे, प्राचार्य विजय गायकवाड, उत्तम लांगडे, भाऊ संदीप काळे यांचा यशात मोठा वाटा असल्याचे सुवर्णा म्हणाली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, पदाधिकारी नंदकुमार झावरे, जी. डी. खानदेशे आदींनी सुवर्णाचा सत्कार केला.

सनदी सेवेत जाण्याची इच्छा
न्यू आर्टस् महाविद्यालयात एमएच्या दोन वर्षांत खूप काही शिकता आले. सध्या सनदी सेवेच्या परीक्षांची तयारी मी करत आहे. सोनईतील यशवंत स्टडी सर्कलमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या तयारीतून सनदी सेवेत जाण्याची इच्छा पूर्ण होईल, असे वाटते. सुवर्णा भगवान काळे, सुवर्णपदकविजेती विद्यार्थिनी.