आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तिक स्थानकासमोर रिपाइंचे रिक्षास्थानक, तत्पर सेवा देण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्टेशन रस्त्यावरील स्वस्तिक बसस्थानकाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रिक्षास्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रिपाइंचे प्रदेश सचिव अशोक गायकवाड यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहराध्यक्ष नाना पाटोळे, बस स्थानकाचे व्यवस्थापक दिलीप शिंदे, विजय भांबळ, बसस्थानक रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष सुनील तुरे, उपाध्यक्ष भीमराव घोडके, सुजित घंगाळे, चंद्रकांत ठोंबरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या बसस्थानकात बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांना रिक्षाची सोय होण्यासाठी रिक्षास्थानक गरजेचे होते. रिक्षाचालकांनी प्रवाशांना प्रामाणिकपणाने उत्तम सेवा द्यावी, असे आवाहन अशोक गायकवाड यांनी केले.

यावेळी बाळासाहेब भिंगारदिवे, बाळासाहेब गायकवाड, यासीन शेख, राहुल पवार, राजू शेख, दिलीप औशीकर, योहान कदम, सुनील सटाणकर, श्याम चिपाडे, गणेश भालेराव, संजय कसबे, सुधाकर साळवे आदींसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वस्तिक बसस्थानकाजवळ रिक्षा स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी अजय साळवे, नाना पाटोळे, दिलीप शिंदे, विजय भांबळ, सुनील तुरे, भीमराव घोडके आदी.