आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकावर जमावाकडून तलवारीने प्राणघातक हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माळीवाडायेथील तरुणास १०-१५ जणांनी अडवून तलवारीने हल्ला केला. नागरिकांवरही दगडफेक करण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुमारे वीस जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे दंगलीचा गुन्हा नोंदवला.
अमोल भाऊसाहेब येवले (गोंधळेगल्ली, माळीवाडा) कोतवाली पोलिस ठाण्यात आला होता. तेथील काम आटोपून तो मित्रासह दुचाकीवरुन तख्ती दरवाजाकडून शनिचौकाकडे जात होता. त्याचवेळी एका पुस्तकाच्या दुकानासमोर १०-१५ जणांच्या जमावाने त्याला अडवून शिवीगाळ, दमदाटी करुन लाकडी दांडके तलवार, चॉपरने त्याच्यावर हल्ला चढवला. आरडाओरडा झाल्यामुळे परिसरातील नागरिक तेथे गोळा झाले. जमावाने चौकात दगडफेक करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गंभीर जखमी झालेल्या येवले यास नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात हलवले. कोतवाली पोलिसांनी जावेद शेख, अरफाज शेख, बोबो शेख, बब्बू शेख, गुड्डू शेख, अजहर शेख, राज बागवान यांच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड करत आहेत.