आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्क केलेल्या कारमधून चोराने लांबवला टॅब्लेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पार्किंगमध्ये लावलेली कार बनावट चावीने उघडून त्यात ठेवलेला ४० हजार रुपयांचा टॅब्लेट चोराने लांबवला. हा प्रकार नगर-मनमाड महामार्गावर झोपडी कँटीनजवळ शनिवारी दुपारी घडला.
विजय श्रीराम सबलोक (वय ४२, रा. आखेगाव रोड, शेवगाव) हे शनिवारी कामानिमित्त नगर येथे आले होते. त्यांनी त्यांची इनोव्हा कंपनीची कार (एमएच १६ एजे ६०४४) झोपडी कँटीनजवळच्या कामदा मशीन टूल्ससमोरच्या पार्किंगमध्ये लावली होती. दुपारी दीड ते अडीच या तासाभराच्या कालावधीत भामट्याने बनावट चावीने त्यांची लॉक केलेली कार उघडली. आत ठेवलेला सॅमसंग कंपनीचा ४० हजार रुपये किमतीचा टॅब्लेट, वेगवेगळ्या बँकेचे तीन एटीएम कार्ड, घराच्या चाव्या, एअरतिकिटे असा ऐवज कारमधून लांबवण्यात आला.

काही वेळाने कारजवळ आल्यानंतर सबलोक यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कारची काच फोडून आतील किमती साहित्य लांबवण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत.