आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लासिक संकल्पनांना मानाचा "टॅग' पुरस्काराचा तुरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टॅग या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट डिझाईनिंग टॅग अवॉर्ड २०१५ कवी रामदास फुटाणे सचिन आंबेकर यांच्या हस्ते स्वीकारताना क्लासिक टीमचे विवेक कुबेर, नेहा हिरे.)
नगर - गेल्या २६ वर्षांपासून डिझाईनिंग अॅडव्हर्टायझिंग क्षेत्रात सेवा देणाऱ्या क्लासिक उद्योग समूहाला डिझाईनिंग क्षेत्रातील मानाचा टॅग २०१५ हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट डिझाईनिंगसाठी नुकताच बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे सचिन आंबेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.येथील स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ संघटना या संस्थेसाठी स्त्रीभ्रूण हत्या या सामाजिक विषयाला अनुसरून जाहिरातीस यंदाचा टॅग २०१५ हा अवॉर्ड मिळाला आहे.
क्लासिक पब्लिसिटीच्या परिवारात १७५ जणांचा समावेश आहे. स्टॅस्टिक, प्लॅनिंग, अॅनालिसीस कॉर्पोरेट ब्रँडिंग अशा विविध विषयांवर येथे काम सुरू असते. उत्पादन, सेवा, व्यवसाय, त्याच वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केल्यानंतर त्याला भारतीय संस्कृती, राष्ट्रप्रेम, सामाजिक मूल्य यांचे भान ठेवून जोड देऊन डिझाईनिंगची रचना केली जाते. स्पर्धेच्या युगात ग्राहकांच्या हृदयावर राज्य करायचे असेल, तर ब्रँडिंगला पर्याय नसतो. पण हे ब्रँडिंग वास्तववादी करण्यावर भर दिल्याने देशभरातील नामांकित कंपन्या, व्यवसाय उद्योग समूह क्लासिकशी जोडले गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...