आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दविसांत काविळीच्या रुग्णांचा आकडा १३५ वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दूषित पाण्याची समस्या गंभीर बनल्याने मागील चार दविसांत शहरात काविळीचे १३५ रुग्ण आढळले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रभावी उपाययोजना करणे अपेक्षित होते. तथापि, महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसून काविळीच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. आगरकर मळा, आनंदनगर, गजानन कॉलनी, स्मृती काॅलनी, शिवनेरी चौक आदी भागात काविळीचे रुग्ण आढळले आहेत. या भागात प्रशासनाने पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गळती लागलेल्या जलवाहिन्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागामार्फत उपाययोजना सुरू आहेत. पाण्याचे शुिद्धकरण करण्यासाठी क्लोरिनचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. काविळीच्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या १३५ वर पोहोचली. या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागासह महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य नागरिकही काविळीच्या भीतीने धास्तावले आहेत.

दरम्यान, केडगाव भागातील पाणीपुरवठ्यातही अजून सुधारणा झालेली नाही. सुधािरत पाणी योजनेचे काम रखडले असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
घरातील सर्वांनाच कावीळ
माझ्या माहेरी चौघांनाही कावीळ झाली आहे. पंधरा दिवसांपासून दूिषत पाणीपुरवठा सुरू होता. आई वयस्कर असल्याने डॉक्टरांना घरी बोलवावे लागते. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच ही परििस्थती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.” सािरका बाफना, नागरिक, आगरकर मळा.
पिण्याच्या पाण्यामध्ये शेवाळ
भोसले आखाडा परिसरात पाण्यामध्ये शेवाळ येत आहे. प्रशासनाकडून कावीळ रोखण्यासाठी कोणतीही कार्यवाही होत नाही. स्वच्छ पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. प्रशासन नागिरकांना दूषित पाणी देते. त्यामुळेच आम्हाला या स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.” मनोज कुलथे, भोसले आखाडा.
उपाययोजना सुरू
शुक्रवारी आगरकर मळ्यात नव्याने १३, एमएसईबी कॉलनी, विनायकनगरमध्ये २० व शहरातील इतर भागात २८ रुग्ण आढळून आले. हा आकडा आजअखेर १३५ वर पोहोचला आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.”
डॉ. सतीश राजूरकर, मनपा.
ड्रेनेज व जलवाहिनी एकत्रच
बंगाल चौकी परिसरात ड्रेनेजलाइन व पाण्याची वाहिनी एकत्रच आहे. ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीमध्ये उतरते. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मला कावीळ झाली आहे. उपचारासाठी लागणारा खर्च जास्त आहे. प्रशासनाने निदान मोफत उपचार तरी करावेत.”
सय्यद इम्रान, बंगाल चौकी.
आरोग्य विभागाचा सल्ला
शहरात विषाणूजन्य काविळीची साथ पसरल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनवणे व महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी फिरता दवाखाना व बाह्य रुग्ण तपासणी पथकाला भेटी दिल्या. नागरिकांनी पाणी उकळून, गाळून प्यावे, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नयेत, असे सांगण्यात आले. काविळीच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ११ मध्ये आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे.