आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Aid Of Ruling Party Laughable To Vikhe Pichad

सत्ताधा-यांशी हात मिळवणी विखेंसाठी हास्यास्पद - पिचड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर/अकोले - जिल्हा बँकेत लबाड लोक राजकारण करू पहात आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेशी हास्यास्पदरित्या हात मिळवणी केल्याची टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केली.

शेतकरी विकास मंडळाच्या प्रचारार्थ संगमनेर रूंभोडी येथील साईलाॅन मंगल कार्यालयात प्रचार सभा झाली. त्यावेळी पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग होते. आमदार बाळासाहेब थोरात, अरुण जगताप, डॉ. सुधीर तांबे, वैभव पिचड, चंद्रशेखर घुले, आशुतोष काळे, बाजीराव खेमनर, उमेदवार सीताराम गायकर, आशुतोष काळे, राजेंद्र गुंड, दत्तात्रेय वारे, दिलीप शिंदे, यावेळी उपस्थित होते.

पिचड म्हणाले, गेल्यावेळी ज्यांना मी राष्ट्रवादीच्या बळावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवून दिले, त्यांनी आमच्या विरोधातील उमेदवारांना मदत केली. अनेक कामात अडथळे आणणारी ही मंडळी धोका देण्यात पटाईत आहेत. निवडणूक बिनविरोध करू म्हणत त्यांनी अर्ध्या तासातच आपला शब्द फिरवला. त्यांना आता त्यांची जागा दाखवली पाहिजे. सहकारात विघ्न आणणा-यांना धडा शिकवा. भाऊसाहेब थोरात यांनी स्वाभिमान आणि लढाईची शिकवण आम्हाला दिली. शिर्डी ते निळवंडे अशी पाण्यासाठी आपण मोठी पदयात्रा काढणार अाहेत. थोरात यांच्या मदतीने तळेगाव भागाला पाणी दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

राधाकृष्ण विखे यांना फसवणुकीची सवयच
स्वार्थासाठीदुस-याची फसवणूक करणा-या राधाकृष्ण विखे यांनी ही निवडणूक बिनविरोध होत असताना ती सभासदांवर लादली आहे. राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार पांडुरंग अभंग यांनी बिनविरोध निवडणूक होणार म्हणून ठरल्याप्रमाणे आपली उमेदवारी मागे घेतली. मात्र, विखेंनी आमची फसवणूक केली आहे. विखे यांना फसवणुकीची सवयच आहे.'' मधुकरपिचड, ज्येष्ठनेते, राष्ट्रवादी.

िजल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना मधुकर पिचड.

भूलथापा मारणा-यांना बळी पडू नका...
जिल्हाबँकेला भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे अशांच्या नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. जिल्हा बँक आपली मातृसंस्था आहे. शेतक-यांच्या प्रपंचाशी निगडित असलेल्या या संस्थेत राजकारण नको. सहकार मोडीत काढणारे लोक बँकेत शिरकाव करू पहात आहेत. भूलथापा मारणा-यांना बळी पडू नका.'' बाळासाहेब थोरात, आमदार.