आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेत गैरप्रकार झाल्यास गुन्हे दाखल करा, अनिल कवडे यांचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास थेट गुन्हे दाखल करा, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिला. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
कवडे म्हणाले, दहावी बारावीच्या परीक्षेत गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी. गैरप्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. एवढे करूनही गैरप्रकार झाल्यास गुन्हे दाखल करावेत.

माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. २६ मार्चपर्यंत या परीक्षा चालतील. जिल्ह्यात या परीक्षेसाठी ६९ हजार ९५५ विद्यार्थी बसणार आहेत. दहावीच्या परीक्षा ते २६ मार्चदरम्यान होणार असून, या परीक्षेसाठी ७३ हजार ३२ विद्यार्थी बसणार आहेत.
बारावीसाठी रुपवते विद्यालय (ता. नगर), शिवाजी ज्युनिअर कॉलेज (बोधेगाव, ता. शेवगाव), तर दहावीच्या परीक्षेसाठी इंग्लिश मीडियम स्कूल (माका, ता. नेवासे), विद्यामंदिर (राहुरी), नागेश्वर विद्यालय (जामखेड) हे तीन उपद्रवी केंद्रे आहेत. बारावीची ८०, तर दहावीची १६१ परीक्षा केंद्रे जिल्ह्यात आहेत.