आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी, मंडलाधिकार्‍यांचे रजा आंदोलन सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी राज्य तलाठी पटवारी व मंडलाधिकार्‍यांनी बुधवारी रजा आंदोलन सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून तलाठी व मंडलाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निदर्शने केली.

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष रावसाहेब निमसे, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष योगीराज खोंडे व राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडलाधिकारी यांच्यासह तलाठी संघाचे उपाध्यक्ष बी. एन. पवार, सरचिटणीस नानासाहेब वायकर, कार्याध्यक्ष बी. एन. फुलारी, सहचिटणीस व्ही. के. जोशी, खजिनदार एन. जी.टुटे, ए. आर. गवांदे, उमेश गावडे, ए. एम. डमाळे, बी. डी. जाधव, ए. पी. सुपेकर, एस. एन. तनपुरे, एस. डी. ढोले, व्ही. एफ. डेढवाल, व्ही. बी. वैरागर, डी. बी. भुजबळ, टी. व्ही. सुतार, एम. बी. सावंत, जी. के. मोहोळेकर आदी यावेळी उपस्थित होते. तलाठय़ाचे पद प्रशासक म्हणून घोषित करावे, रिक्त पदे तातडीने भरावीत, नायब तहसीलदार पदाचा सरळ सेवा भरतीचा 33 टक्के कोटा रद्द करावा, तलाठी व मंडलाधिकार्‍यांना प्रवास भत्ता मंजूर करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.