आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर घोटाळ्याचा तपास थंडावला, गाजावाजा करणारे पदाधिकारी सोयीस्कर गप्प,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता, या प्रकारात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी खुद्द अध्यक्ष मंजूषा गुंड यांनीच केला होता. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले, परंतु आतापर्यंत याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाही. विशेष म्हणजे अध्यक्ष गुंड यांनी यासंदर्भात सोयीस्कर मौन पाळल्याने टँकर घोटाळ्याची अजूनही चौकशीच सुरू आहे.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती, ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांतून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या एप्रिल ते मे या कालावधीत पाचशेवर पोहोचते. मार्च ते जून २०१६ या कालावधीतही मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु, मंजुर खेपांच्या तुलनेत टँकरने पाणीपुरवठा झालाच नाही. तसेच जीपीएस यंत्रणा टँकरला बसवली होती का? मोटारसायकललाच जीपीएस यंत्र लावून फिरवले का? आदी प्रश्न यापूर्वीच जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केले होते. प्रत्यक्षात खेपा कमी झाल्या असताना मंजूर खेपांच्या प्रमाणात जास्तीचे बिल काढल्याचाही आरोप झाला. स्थायी समितीनेही याबाबत गंभीर टीका केली होती. त्यानंतर अध्यक्ष गुंड यांनी पत्रकार परिषदेत हा मोठा टँकर घोटाळा असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे घोटाळा पदाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्याने उघडकीस येईल, असा अंदाज होता. २५ ऑगस्टला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गटविकास अधिकाऱ्यांकडून तपासणी अहवाल मागवण्यात आला होता. त्या अहवालात तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले, असा प्रशासनाने दावा केला होता. हा दावा मागील सर्वसाधारण सभेत फेटाळून अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळे पुन्हा फेर तपासणीचे आदेश देण्यात आले. जिल्ह्यातील गटविकास अधिकारी परस्परांच्या टँकरने झालेल्या पाणीपुरवठ्याची चौकशी करणार आहेत. तसे आदेश सप्टेंबर २०१६ मध्ये देण्यात आले. तथापि तपासणी अजूनही सुरूच आहे. महिना उलटला, तरी चौकशी झाली नसताना अध्यक्ष गुंड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले, ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
‘नाशिक’ची क्लिन चिट
नाशिकविभागीय आयुक्तांनी धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मे २०१६ या कालावधीत पाणी पुरवठ्याची तपासणी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालात क्लिन चिट मिळाली. याचा उल्लेख प्रशासनाकडून चुकता केला जातो. पण त्यानंतर सुरू झालेल्या क्रॉस तपासणीचा अहवाल अजूनही प्रलंबितच आहे. याबाबत प्रशासन फारसे गंभीर नसल्याचे दिसते.

ताप वाढणार
जिल्हापरिषदेच्या वि‍द्यमान कारभाऱ्यांच्या कार्यकाळात राजगिरा चिक्की घोटाळा, कपाट घोटाळा, पुस्तक घोटाळा आदी प्रकरणे चांगलीच गाजली. त्यानंतर टँकरचा घोटाळा झाल्याचीही चाैकशी सुरू आहे. कपाट घोटाळ्यात कारवाई झाली नाही. बोगस डॉक्टरवर गुन्हे दाखल नाहीत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जाताना सत्ताधाऱ्यांचा ताप वाढणार आहे.
बातम्या आणखी आहेत...