आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनपुरे कुटुंबाच्या 'घरवापसी'चे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपासून दूर गेलेले तनपुरे कुटूंब राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नगर दौऱ्यात दिले. मात्र, माजी खासदार प्रसाद तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुधाकर तनपुरे यांच्यापैकी कोणते तनपुरे राष्ट्रवादीत जातील याबाबत संभ्रमावस्था आहे.

तनपुरे नावाला राजकीय वलय वजन होते. तथापि, गेली १५ वर्षे राज्यात केंद्रात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी असताना येथील नेत्यांना राष्ट्रवादीने अडगळीत टाकले होते. आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जुन्या नेत्यांबद्दलचे प्रेम उचंबळून आले आहे. तनपुरे पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय होणार असे राजकीय वारे वाहू लागले आहेत.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे राजकारण संपुष्टात यायला राष्ट्रवादीचे धरसोडीचे धोरण कारणीभूत आहे. तनपुरे यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत पाऊल टाकले. १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी उभे रािहले. तेथेच त्यांचे राजकीय गणित चुकले. त्यावेळी ते काँग्रेसकडून उभे राहिले असते तर मंत्री झाले असते. १९९८ पोटनिवडणुकीत राहुरी विधानसभेत कमळ फुलले. मात्र, भाजपचे उमेदवार नातेवाईक असल्याने त्यांना दुखवायचे नाही हे धोरण अवलंबल्याने तेव्हापासून एखादा अपवाद वगळता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे यांना उमेदवारीसाठी वाट पहावी लागली. ज्यांना तनपुरे यांनी बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच केले, त्यांनीच प्रचारसभेत राष्ट्रवादीचे घड्याळ लावून प्रचाराचे नारळ फोडल्याने तनपुरे यांच्यापुढे राष्ट्रवादी सोडण्यािशवाय पर्याय नव्हता. तनपुरे यांच्या पत्नी डॉ. उषा शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन उभ्या रािहल्या. परंतु त्यांनाही पराभव पत्करावा लागला. लोकसभेत राष्ट्रवादीपासून दुरावलेल्यांना राष्ट्रवादीच्या मूळ प्रवाहात जोडण्याचे संकेत मिळत आहेत.