आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - राहुरी येथील बाबुराव तनपुरे कारखान्याकडे 3 कोटी 77 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद होण्याची टांगती तलवार कारखान्यावर आहे. पाणीपट्टी भरण्याबाबत पाटबंधारे विभागाकडून कारखान्याला नोटिसा बजावल्या आहेत. थकबाकीचा भरणा न केल्यास टप्प्याटप्प्याने पाणी कपातीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
उत्तर नगर जिल्ह्यात तनपुरे कारखान्याच्या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात ऊसउत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे साखर कारखान्याला उसाची चणचण भासत नाही. कारखान्याची अवस्था बिकट व्हायला नको, असे जाणकारांचे मत आहे. बर्याचदा कारखाने आरक्षणापेक्षाही कमी पाणी वापरतात. परंतु पाणीपट्टी मंजूर पाण्याच्या 90 टक्के भरावी लागते. कारखान्यात औद्योगिक वापरासाठी 25 दशलक्ष घनफूट, पिण्यासाठी 10 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. पैकी सुमारे 14 दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. कारखान्याकडून कमी पाण्याचा वापर झाला, तर मंजूर पाण्याच्या किमान 90 टक्के पाणीपट्टी आकारण्यात येते. जर कारखान्याचा पाणीवापर कमी होणार असेल, तर सप्टेंबरपर्यंत व्यवस्थापनाने पाटबंधारे विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तनपुरे कारखान्याकडे सुमारे 3 कोटी 77 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ म्हणाले, कारखान्याला पाणीपट्टी थकबाकीबाबत कळवले आहे. नोटिसादेखील काढल्या आहेत. सहायक साखर संचालक कार्यालयालादेखील पाणीपट्टी थकबाकीची माहिती पाठवली. जर थकबाकी भरली नाही, तर कारखान्यावर टप्प्याटप्प्याने पाणी कपात करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे निर्मळ यांनी सांगितले.
सत्ताधार्यांनी आपली विश्वासार्हता गमावली
मागील वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे 14 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होता. पैकी 8 ते 9 लाख टन उसाचे गाळप होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात अवघे सव्वादोन लाख मेट्रिक टन गाळप होऊ शकले. तसेच, कारखान्याने कामगारांचे पगारदेखील थकवले आहेत. हे सारे काही सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे झाले. तनपुरे कारखान्याला उजिर्तावस्थेत आणता येईल, पण सत्ताधार्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. कारखाना आमच्या ताब्यात दिला असता, तर कारखान्याची ही अवस्था झाली नसती.’’ शिवाजी गाडे, सभापती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.