आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तापी पतपेढी घोटाळाप्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तापी सहकारी पतपेढीत 4 लाख 16 हजार रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी पतपेढीचा मुख्य सचिव तथा रोखपाल संतोष सुदाम गोरे (36, दरेवाडी) याला मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. भालेराव यांनी गुरुवारी 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली.

गोरे याने एप्रिल 2007 ते ऑगस्ट 2008 दरम्यान 4 लाख 15 हजार रुपयांचा अपहार केला. सभासदांच्या नावे बनावट ठेव तारण, सभासदांच्या नावे बनावट व्हाऊचर व पावत्या करून, तसेच रोख रकमेचा अपहार त्याने केला. किरण मगन पारधे (बेलेश्वर कॉलनी) यांच्या फिर्यादीवरून 29 जुलै 2011 रोजी गोरेविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गोरे याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली. सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिस कोठडी दिली.