आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौफिक यांच्या तालवादनाची १९ला मैफल, पं. रामदास पळसुले जलतरंगवादक तुळाणकर यांचाही सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत उस्ताद तौफिक कुरेशी यांचे तालवादन ऐकण्याची संधी नगरच्या रसिकांना येत्या रविवारी (१९ एप्रिल) मिळणार आहे. प्रसिद्ध तबलावादक पंडित रामदास पळसुले जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांचाही सहभाग या "मास्टर्स ऑफ ऱ्हिदम'मध्ये असेल. देश-विदेशांत हार्मोनियम वादन करणारे नगरचे तन्मय देवचके उस्तादजींना साथसंगत करतील.
मागील तीन वर्षांपासून "अनुनाद' नगरच्या रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देत आहे. येत्या रविवारी सायंकाळी वाजता सावेडीतील माउली सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे धाकटे बंधू उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या तालवादनाचा आविष्कार नगरकरांना अनुभवता येईल. वयाच्या चौथ्या वर्षापासून तौफिक यांना वडिलांकडून धडे गिरवायला सुरुवात केली. आफ्रिकन "जेंबे' या वाद्याने त्यांना आकर्षित केले. प्रचंड रियाज करून त्यांनी या अवघड वाद्यावर हुकमत प्राप्त केली आहे.
"मास्टर्स ऑफ ऱ्हिदम' या कार्यक्रमात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैफलीत तबलावादन करणारे पंडित रामदास पळसुले दुर्मिळ झालेले जलतरंग हे वाद्य वाजवणारे मिलिंद तुळाणकर हेही आपली कला सादर करणार आहेत. "अनुनाद'चे संस्थापक तन्मय देवचके यांचे हार्मोनियम वादनही यावेळी होणार आहे. युरोप, अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया येथे त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. रसिकांनी या मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनुनादचे कल्पेश अदवंत यांनी केले.
शुभंकर कांबळे काढणार चित्र
मैफल सुरू असताना नगरचे नवोदित चित्र-शिल्पकार शुभंकर प्रमोद कांबळे हे चित्राचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. या मैफलीचे निवेदक पुण्याचे आनंद देशमुख आहेत. मागील अनेक वर्षे ते पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवात आपल्या निवेदनाने रसिकांना मंत्रमुग्ध करत आले आहेत.