आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमदान हडकोतून तवेरा जीप चोरीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रेमदान हडको परिसरात लावलेली आठ लाख रुपयांची तवेरा जीप चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी चालक राहुल वसंत मोरे (३०, वाघोली, ता. शेवगाव) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बदामी रंगाची तवेरा (एम. एच १६ एटी ८५६१) दोन दिवस शोध घेऊनही न सापडल्यामुळे मोरे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. तोफखाना पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल बी. एफ. माघाडे हे करत आहेत. वाहनचोरीचे बरेच गुन्हे अजून उघडकीला आलेले नाहीत.