आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँक निवडणूक : छाननीत 7 अर्ज बाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ६८२ अर्जांपैकी अर्ज बाद झाले. प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर २५ ते २९ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करण्याची होती. या कालावधीत विक्रमी ६८२ अर्ज दाखल झाले होते. त्यात राखीव जागांसाठी २८३ सर्वसाधारण जागांसाठी ३९९ या अर्जांची शनिवारी छाननी करण्यात आली. त्यात अर्ज बाद झाले. ६७५ अर्ज मंजूर करण्यात आले. ज्ञानेश्वर वाकचौरे (कोपरगाव, सदिच्छा), प्रमोद घोडके (श्रीगोंदे, ऐक्य), संतोष खामकर (पारनेर, गुरुमाऊली)अण्णासाहेब आंधळे (पाथर्डी, अपक्ष), आशा इल्हे (कोपरगाव, गुरुमाऊली), प्रदीप कांबळे (जामखेड, ऐक्य), या उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
माघारीची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. माघारीचा कालावधी मोठा असल्याने तडजोडींना गती येणार आहे. गुरुकूल, गुरुमाऊली, इब्टा, सदिच्छा, ऐक्य, गुरुसेवा मंडळांकडून चर्चेसाठी नियोजन आखण्यात आले आहे. प्राथमिक चर्चा बहुतेक मंडळांची झाली असली, तरी तडजोडीसाठी स्वतंत्रपणे कोणीही बसलेले नाही. लहान मंडळांकडून सहा ते सात जागांची मागणी होत असल्याने मोठी मंडळे अस्वस्थ झाली आहेत.

१६फेब्रुवारीला अंतिम चित्र
अवघ्या२१ जागांसाठी ६७५ अर्ज पात्र ठरल्याने माघारीसाठी मनधरणी करताना शिक्षक नेत्यांची दमछाक होणार आहे. दरम्यान पार्ट्या रंगणार असल्याचेही खासगीत काही शिक्षकांनी सांगितले. माघारीची मुदत संपल्यानंतर १६ फेब्रुवारीला निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.