आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँक : सभा गुंडाळण्याची प्रथा २२ वर्षांनंतर मोडीत, गोंधळाची परंपरा गुरुजींनी जपली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ, हाणामारी, शिवीगाळीचे प्रकार होण्याची परंपरा अाहे. या परंपरेची गुरुजींनी रविवारी झालेल्या सभेतही पुनरावृत्ती केली. पण १५ मिनिटांत सभा गुंडाळण्याची प्रथा ‘गुरुमाउली’ने मोडीत काढली. गोंधळानंतर चार तास सभा शांततेत झाली. त्यामुळे सभा गुंडाळण्याची प्रथा २२ वर्षांनंतर मोडीत निघाली.
कायम ठेव वाढीच्या पोटनियम दुरुस्तीच्या विषयाला कडाडून विरोध करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतल्यानंतर रावसाहेब रोहोकलेंनी कायम ठेववाढीच्या प्रस्तावात दोन पावले मागे घेऊन ती हजार ५०० करण्याचा प्रस्ताव ठेवला. या मुद्द्यावरूनही पुन्हा गोंधळ झाल्याने पोटनियम दुरुस्तीला गोंधळातच मंजुरी दिली.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नंदनवन सभागृहात अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संचालक उपाध्यक्ष दिलीप आैताडे, संतोष दुसुंगे, किसन खेमनर, नानासाहेब बडाख, राजू मुंगसे, साहेबराव अनाप, बाबासाहेब खरात, विद्युलता आढाव, बाळासाहेब मुखेकर, अविनाश निंभोरे, शरद सुद्रिक, सीमा क्षीरसागर, संतोष अकोलकर, अनिल भवार, सलीमखान पठाण, गंगाराम गोडे, उषा बनकर, मंजूषा नरवडे, राजू राहाणे, अर्जुन शिरसाठ, अरुण देशमुख आदी उपस्थित होते.
बँकेच्या वार्षिक सभा नियोजित वेळेत सुरू होत असताना इब्टा, सदिच्छा, गुरुकुलने पोटनियम दुरुस्तीला विरोध करत निदर्शने केली. यातच शिवीगाळ झाल्याने कार्यकर्ते संतापले झोंबाझोंबी करीत हाणामारीचाही मार्ग अवलंबला जाऊ लागला. विरोधी नेत्यांसह काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. सत्ताधारी शांततेचे आवाहन करत होते, पण गुरुजींनी हातात नामंजुरीचे फलक घेऊन सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. त्याच वेळी काहींनी कोअर बँकिंग घोटाळ्याप्रकरणी ‘चोर-चोर’ अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण चिघळले. गुरुमाउली मंडळ, सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ आमने-सामने येऊन अर्वाच्च भाषा वापरू उर्वरितपान वर
असा झाला गैरव्यवहार
कोअर बँकिंग प्रणालीसाठी ७६ लाख ७४ हजार ७०७ रुपये खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात याची बाजारभावाप्रमाणे १९ लाख ४६ हजार रुपये किंमत अपेक्षित होती. त्यामुळे ५७ लाख अतिरिक्त खर्च झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असल्याचे रोहोकलेंनी सभेत जाहीर केले.
पुढे काय होणार?
सभेत सव्वा कोटीच्या खरेदी खर्चाला नामंजूर करण्यात आले. या सभेचे प्रोसेडिंग जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवले जाईल. याची चौकशीचीही शिफारस संचालक मंडळाकडून केली जाऊ शकते. जिल्हा उपनिबंधक याची चौकशी लावून जर गैरव्यवहार आढळला तर जबाबदारी निश्चित करून वसुलीच्या नोटिसा देतील.
कोणीतरी माइक द्या हो...
गुरुकुलचेशिक्षक नेते संजय धामणे यांनी पोटनियमाला विरोध करताना स्वत:ची भूमिका मांडण्यासाठी वारंवार माइकची मागणी केली. तथापि माइक कोणीच देईना, ओरडून घसा कोरडा पडला. सभेच्या शेवटी पुन्हा त्यांनी माइकवर झडप घातली. त्यासाठी त्यांना पुन्हा बापू तांबेंबरोबर झोंबाझोंबी करावी लागली.
सभा ऐतिहासिक का ?
बँकेचीस्थापनेनंतर काही वर्षे दोन दिवसही शांततेत चालायची. पण मागील वीस वर्षांपासून या सभेला गोंधळाची परंपरा लागली. त्यानंतर सभा तब्बल पाच तास चालण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील काही वर्षांत पंधरा मिनिटांत सभा संपवून मनमानी प्रोसेडिंग लिहिले जात होते, पण यावर्षी सर्वांनाच मत मांडण्याची संधी मिळाली.
हे विषय झाले मंजूर
>स्त्रीजन्मासाठी ११ हजारांची ठेव
>कायम ठेव हजार ५००
>मृत निधीचे नामकरण
>विकास मंडळाच्या इमारतीसाठी शेअर घेणे
>अजेंड्यावरील १० विषय
>बँकेचे सभासदच विकास मंडळाचे सभासद असतील
१.२८ कोटींच्या खरेदीला नकार
मागील संचालक मंडळाने बॅटरी, यूपीएस, स्कॅनर, प्रिंटर यासाठी ३८ लाख ८० हजार, रंगरंगोटीसाठी १२ लाख ८८ हजार, कोपरगाव, राहुरी, शेवगाव शाखेतील स्ट्राँगरूमसाठी ७६ लाख ५३ हजार खर्च केला. अशी एकूण कोटी २८ लाखांच्या खरेदीची प्रक्रियाच सभागृहाने नामंजूर केली.
बातम्या आणखी आहेत...