आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त मुख्याध्यापक गरड यांची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बाई इचरजबाई फिरोदिया शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश गरड (६२, समतानगर) यांनी रविवारी दुपारी धावत्या रेल्वेगाडीखाली जीवनयात्रा संपवली. हा प्रकार निंबळक रेल्वेस्थानकाजवळ दुपारी एकच्या सुमारास घडला. गरड यांनी पंधरा वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली. निवृत्त होऊन दोन वर्षे झाली होती.
एमआयडीसीतील वर्कशॉपमध्ये ते सकाळी गेले होते. नंतर ते घरी परतलेच नाहीत. गरड यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगा, सून, मुलगी असा परिवार आहे. ते मूळचे पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथील रहिवासी. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना अादर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले, तरी मानसिक तणावातून हा प्रकार घडल्याचे समजते. तशी चर्चा िशक्षकांच्या वर्तूळात संध्याकाळी सुरू होती. या प्रकरणाचा पोिलस तपास सुरू आहे.