Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | teacher to get dearness allownce

शिक्षकांना नोव्हेंबरच्या पगारात मिळणार सात टक्के महागाई भत्ता

प्रतिनिधी | Update - Oct 21, 2011, 09:08 AM IST

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना नोव्हेंबरच्या पगारात 7 टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार असल्याची माहिती शहर माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

  • teacher to get dearness allownce

    नगर - जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना नोव्हेंबरच्या पगारात 7 टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार असल्याची माहिती शहर माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सुनील गाडगे यांनी दिली. तसे आदेश जिल्हा माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे व वेतन पथक अधीक्षक सुयश दुसाणे यांनी दिले आहेत. अशासकीय मान्यताप्राप्त, अनुदानित व अशंत: अनुदानित शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा केली आहे. 1 ऑक्टोबरपासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 51 टक्क्यावरून 58 टक्के केला आहे. नोव्हेंबरचे वेतन देयकामध्ये 7 टक्के महागाई भत्ता समाविष्ट करून व ऑक्टोबर महिन्याची एक महिन्याची थकीत रक्कम स्वतंत्र लाल शाईने दाखवावी व वेतन देयक वेतन पथकास सादर करावे, असे वेतन पथक अधीक्षक दुसाणे यांनी सांगितले.

Trending