आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरजिल्‍हा बदलीचा वाद अजून चिघळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्‍हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा आंतरजिल्‍हा बदलीने भरण्यासाठी सध्या लगीनघाई सुरू आहे. बेरोजगारांना या रिक्त जागांवर नियुक्ती द्यावी, असा आग्रह संघटनांनी धरला आहे. त्यामुळे आंतरजिल्‍हा बदलीचा वाद आणखी चिघळणार आहे.
सध्या शिक्षकांच्या सुमारे ३०० हून अधिक जागा रिक्त आहेत. यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेतील अनेकजण नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर संधी मिळेल, अशी आशा या बेरोजगारांना आहे. या जागा आंतरजिल्‍हा बदलीने भरायच्या की, नवीन भरतीने याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मूळचे नगर जिल्‍हयातील अनेक शिक्षक इतर जिल्‍हृयां मध्ये आहेत. या शिक्षकांकडून आंतरजिल्‍हा बदलीने नगर जिल्‍हयात नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा मुद्दा कळीचा ठरला असून आता अ. भा. मराठा महासंघ, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास व संभाजी ब्रिगेडने रिक्त जागांवर बेरोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे. तथापि, २० आॅगस्टला झालेल्या स्थायीच्या सभेत आंतरजिल्‍हा बदलीने येणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्‍हा परिषद विरुद्ध वविधि संघटना असा संघर्ष सुरू झाला आहे.
इतर जिल्‍हृयां तील शिक्षकांना आंतरजिल्‍हा बदलीने नियुक्ती दिल्‍यास इतर जिल्‍हृयां मध्ये जागा रिक्त होतील. त्या ठिकाणी बेरोजगारांना संधी मिळेल, असे काही अधिकारी खासगीत सांगतात. मात्र, सप्टेंबरअखेर पटपडताळणी झाल्यास नगरसह इतर जिल्‍हृयां मध्ये शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे रिक्त जागांवर प्राधान्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे लागणार आहे. इतर जिल्‍हृयां तही तातडीने जागा रिक्त होण्याची शक्यता कमी आहे.