आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक बँकेतून परस्पर काढले दोन लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाची खाती आहेत. या खात्यातून पैसे काढण्याचा अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. परंतु खरे पदाधिकारी कोण, याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असताना एका गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये काढले. त्यामुळे शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी बँकेकडे तक्रार केली आहे. हा अपहार असल्याचाही आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात २००८ मध्ये फूट पडली, त्यावेळी बाळकृष्ण तांभारे, संभाजी थोरात, राजाराम वरुटे शिवाजी पाटील असे दोन गट निर्माण झाले. पुढे वरुटे पाटील एकत्र आले. पाटील गटाचे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र शिंदे थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेळके असे दोन जिल्हाध्यक्ष एकाच संघटनेला मिळाले. यापैकी अधिकृत जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी कोण, यावरून नवा वाद उभा राहिला. हा वाद धर्मादाय आयुक्तांकडे गेला आहे. यावर अद्यापि कोणताही निर्णय झाला नाही.

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (खाते क्रमांक २६०) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ (खाते क्रमांक ३२२) अशी दोन स्वतंत्र खाती जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत आहेत. या खात्यांत सभासद वर्गणीतून जमा झालेले पैसे आहेत. परंतु अधिकृत पदाधिकारी कोण याचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने या खात्यांवर व्यवहार झाला नव्हता. रोहोकले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुमाउली मंडळाची बँकेत सत्ता स्थापन केल्यानंतर या खात्यातून पैसे काढण्यात आले. २७ सप्टेंबरला राज्य संघाच्या खात्यातून ९७ हजार जिल्हा संघाच्या खात्यातून लाख हजार ५०० रुपये काढण्यात आले, जर अधिकृत संघटनेचा वाद न्यायप्रविष्ट असेल, तर खात्यात व्यवहार करण्याचा अधिकार कोणालाच नाही. रोहोकलेंना संघाचे पैसे काढण्याचा घटनात्मक अधिकार नसतानाही त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. संजय शेळके, संभाजी थोरात यांनी बेकायदेशीरपणे पैसे काढले, असा आरोप शिंदे यांनी केला आहे.

आरोप बिनबुडाचे
^सर्वजिल्ह्यांमध्ये शिक्षक संघाचे खाते संभाजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. नियमानुसारच पैसे काढले आहेत. माझी स्वाक्षरी समक्ष होतो, म्हणून घेतली. माझा त्यात संबंध नाही, जर पैसे चुकीच्या पद्धतीने काढले असे सिद्ध झाले, तर व्याजासह पैशांचा भरणा करू.'' रावसाहेबरोहोकले, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक, अहमदनगर.

गुन्हे दाखल करणार
^अधिकृत संघटनेचा वाद न्यायप्रविष्ट असताना पदाचा गैरवापर करून घटनाबाह्य पद्धतीने लाख काढण्यात आले. हे पैसे सात दिवसांत भरावेत; अन्यथा नोटीस देऊन रावसाहेब रोहोकले, संभाजी थोरात आणि अरुण देशमुख यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जातील.'' संजय शेळके, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ.
बातम्या आणखी आहेत...