आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची भूमिका ही गुरू पालक नात्याची असावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिक्षकांचीभूमिका ही गुरू पालकांची असावी. अनाथ मुलांसाठी गणवेश मिठाई वाटप हा कार्यक्रम विशेष बाब आहे, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
सावेडील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्राथमिक विभागातर्फे रिमांड होममधील मुलांना दिवाळीनिमित्त गणवेश मिठाई वाटपप्रसंगी महापौर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. आर. कुलकर्णी, तर प्रमुख पाहुणे म्हणून चाइल्डलाइनचे संचालक हनिफ शेख उपस्थित होते. महापौर कदम यांनी यावेळी शाळेचे संस्थेचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात कुलकर्णी यांनी बोलण्यापेक्षा कृतीतून एखादे कार्य करावे, असा सल्ला दिला. शालेय समितीचे अध्यक्ष विकास सोनटक्के यांनी लालबहादूर शास्त्रींच्या गोष्टींतून काटकसर करून गरजूंसाठी योगदान देण्याचा संदेश दिला.

भारताला बलवान करण्यासाठी शाळेतून संस्कारक्षम विद्यार्थी घडावेत, अशी अपेक्षा हनिफ शेख यांनी व्यक्त केली. प्रास्तािवक मुख्याध्यापक डी. एम. कासार यांनी केले. ते म्हणाले, संतांच्या विचारांतून, कीर्तनातून मानव देह हा परमेश्वराची सेवा इतरांच्या जीवनात आनंद भरण्यासाठी आहे, असे सांगितले जाते. त्याप्रमाणेच शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच मदतीचा हात देण्याच्या संस्काराचे धडे शाळेत देत असताे, असे सांगितले. यावेळी उपस्थितांकडून प्रदूषणमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य सुरेश क्षीरसागर, स्वप्नील कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी जाधव यांनी, तर आभार भगवान जाधव यांनी मानले.

अनाथांचे जीवन प्रकाशमय व्हावे
^सणांचाराजाअशी ओळख असलेला दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाची उत्साहाची पर्वणी असतो. दिवाळीत मिठाई, फटाक्यांची आतषबाजी, फराळ आणि नवे कपडे याची मजा काही औरच असते. मात्र, बहुतांश मुलांना परिस्थितीमुळे दिवाळी साजरी करता येत नाही. अशा रिमांड होममधील बालकांना आपलेसे करून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी प्रशालेतर्फे छोटीसी भेट देण्यात आली.'' डी.एम. कासार, मुख्याध्यापक, समर्थ विद्या मंदिर, सावेडी.
बातम्या आणखी आहेत...