आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीटेकसाठी महेशला अनामप्रेमकडून मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कर्णबधिर महेश गुंड शालेय जीवनापासून विशेष प्रावीण्य मिळवणारा... पण कौटुंबिक स्थिती हलाखीची असल्याने त्याने संघर्ष करून शिक्षणाची कास धरली. आता तो बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. पण या अभ्यासक्रमाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने तो
हताश झाला होता. त्याला अनामप्रेम या अंध, अपंग, मूकबधिर मुलांना आशाकिरण दाखवणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने आधार दिला. शिक्षण हक्क कायदा आला, पण अनेक तरुणउच्चशिक्षणापासून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे वंचित राहतात. कौटुंबिक स्थिती गरीब
असलेल्या अनेक मुलांना पोट भरण्यासाठी काम करावे लागते. त्यामुळे एक मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित रहात आहे. अशा मुलांना आशेचा किरण दाखवणाऱ्या स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. नगर तालुक्यातील पारगाव भातोडी येथील महेश हा कर्णबधिर विद्यार्थी. चौथीपासून त्याने विशेष प्रावीण्य मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लहानपणापासून संघर्ष करत शिक्षण घेण्याची जिद्द महेशने ठेवली. या जिद्दीच्या जोरावर यश मिळवत तो पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत बीटेकचे शिक्षण घेत आहे. पण गरिबीमुळे बीटेकच्या शेवटच्या वर्षातील शैक्षणिक शुल्क त्याला भरता येत नव्हते. शुल्क भरल्यामुळे बीटेक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहील, अशी भीती महेशला वाटत होती. हताश झालेला महेश अनामप्रेममध्ये मदतीसाठी गेला. अनामप्रेमचे अजित माने डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी शुल्क भरून त्याला मोठा आधार दिला. व्हीआयटी संस्थेत प्रवेश मिळावा, यासाठी गर्भश्रीमंत देणग्यांच्या थैल्या घेऊन रांगेत तिष्ठत असतात. पण महेशसारख्या अपंग तरुणाला शैक्षणिक गुणवत्ता असूनही शुल्क भरता येत नसल्याने भविष्य मातीमोल होण्याची भीती होती. अनामप्रेमने हात दिल्याने त्याचा शैक्षणिक मार्ग सुकर झाला. महेशच्या आई-वडिलांचीही चिंता कमी झाली अाहे.

शिक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील
महेशगुंड याच्या उज्वल भविष्याचा मार्ग सुकर झाला आहे. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या अंध, अपंग कर्णबधीर मुला-मुलींच्या शिक्षणासाठी
आम्ही प्रयत्नशील आहोत. महेशच्या आई-वडिलांचीही चिंता आता कमी झाली आहे, असे अजित माने डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी सांगितले.
पैसे संपले होते...
दुष्काळीपरिस्थिती असल्याने सोयाबीनचे पीक करपून गेले. पैसेही संपले. त्यामुळे शिक्षणाची वाट कठीण वाटत होती. पण अनामप्रेमचे
अजित माने डॉ. कांडेकर यांनी मदत केली. मला कानाचे यंत्र कपडेही घेऊन दिले. शैक्षणिक फीदेखील भरली. ते माझ्यासाठी खूप फिरले.
त्यांना धन्यवाद देईन तेवढे थोडे आहेत.'' महेश गुंड, विद्यार्थी.
२०० मुले स्वावलंबी
अनामप्रेमचे हे दशकपूर्ती वर्ष आहे. आतापर्यंत २०० हून अधिक अंध, अपंग मूकबधीर मुलांना स्वावलंबी जीवनाचा मार्ग सापडला. अंध अपंगांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशवाटा हे त्रैमासिक आम्ही सुरू करणार आहोत. भारतातील हे पहिले स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसंदर्भातील ब्रेल मासिक असणार आहे.'' अजित कुलकर्णी, मानद सचिव, अनामप्रेम.