आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औताडेंच्या हल्लेखोरांना अटक करण्‍यासाठी स्वाभिमानी विकास आघाडीचा मूकमोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव- स्वाभिमानी विकास आघाडीचे संस्थापक नितीन भानुदास औताडे यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी विकास आघाडीने सोमवारी शहरात तोंडाला काळ्या फिती लावून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. या प्रकरणातील आरोपींचा व त्यांना राजकीय पाठबळ देणा-या नेत्यांचा निषेध यावेळी करण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व आघाडीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी केले. मोर्चात तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात संजय शिंदे, अ‍ॅड. दिलीप लासुरे, भगिरथ होन, बाळासाहेब राहणे, भाऊसाहेब कोळपे, नितीन शिंदे, दीपकराव देवकर आदी सहभागी झाले होते.

सभास्थानी राहुल रोहमारे, विक्रम पाचोरे, कैलास राहणे, प्रदीप औताडे आदींनी औताडेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून आरोपींना जो पर्यंत अटक होत नाही, तो पर्यंत आघाडी स्वस्थ बसणार नाही. आरोपींना राजकीय पाठबळ देणा-या नेत्यांनाही लोक माफ करणार नाही.