आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोले नगरपंचायतीसाठी ग्रामस्थांनी काढला मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- अकोले ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करावे, या मागणीसाठी अकोले शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी अकोले तहसील कचेरीवर मूकमोर्चा काढला. या वेळी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदन देण्यात आले.
भाजप कार्यकर्ते बबलू धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच जयराम गायकवाड, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दराडे, माजी सरपंच संपत नाईकवाडी आदींचा या मोर्चात सहभाग होता. अकोले ग्रामपंचायत ही अकोले तालुक्याच्या मुख्यालयाचे ठिकाण अाहे. गावाचा िवस्तार झपाट्याने वाढल्याने शहराचे स्वरूप आलेले आहे. शहरीकरणामुळे नागरिकांना अपूर्ण नागरी सुविधांचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत असल्याने ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरवणे व विकासकामे करणे अवघड बनल्याने ग्रामस्थांमध्ये सदस्य मंडळाबाबत नाराजीचा सूर आहे. विकासकामे मार्गी लावण्याचे काम ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे बनल्याने ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याची अनेक वर्षांपासूनची अकोलेकरांची मागणी दुर्लक्षित आहे. बबलू धुमाळ, जयराम गायकवाड, प्रमोद रासने, गणेश कानवडे, श्रीकृष्ण कोळपकर, बाबासाहेब नाईकवाडी, सुभाष कोळपकर, संपत नाईकवाडी यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन दिले.

नगरपंचायतीसाठी जनमताचा रेटा
अकोले येथे नगरपंचायत व्हावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर झाला आहे. शासनाने या प्रस्तावाबाबत आक्षेप, हरकती बोलावल्या होत्या. मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकला असावा. युती सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत व्हावी, यासाठी जनमताचा रेटा असून अत्यावश्यक बाब आहे.'' बबलू धुमाळ, अध्यक्ष, तालीम संघ, अकोले तालुका.