आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहर तापले; तापमान 43.2 अंशावर; यंदाच्या वर्षीतील सर्वाधिक तापमानाची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- उन्हाचा कडाका आणखी वाढला असून सोमवारी नगर शहरातील तापमान ४३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यंदाच्या वर्षीतील सर्वाधिक तापमानाची नोंद सोमवारी झाली.

मागील गेल्या सात दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यंदा मार्च महिन्यातच वैशाख वणवा पेटला होता. मार्च महिन्यात ४२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. १४ एप्रिलला ४३ अंश सेल्सिअस, तर १५ ला ४२.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. रविवारी तापमान ४२ अंशाच्या पुढे होते. सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. सोमवारी ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारी शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. शहरातून जाणारे प्रमुख रस्तेही दुपारी आेस पडलेले दिसत होते. 
बातम्या आणखी आहेत...