आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत प्रभारी राज; नागरी सुविधा कोलमडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेतमागील काही वर्षांपासून सुरू झालेले प्रभारीराज संपण्यास तयार नाही. अतिरिक्त कामाने वर्ग एक दोनमधील अधिकाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या बदलीनंतर आयुक्तपदावरही प्रभारीराज सुरू झाले आहे. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांची जबाबदारी असल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. जोपर्यंत आकृतिबंधास मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. त्याचा परिणाम थेट नागरी सेवांवर होत आहे.
अार्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. एकीकडे शहराचे झपाट्याने विस्तारीकरण होत आहे, तर दुसरीकडे मनपा कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. त्यात वर्ग दोनच्या २८ अधिकाऱ्यांची तर अतिरिक्त कामाने पुरती दमछाक झाली आहे. एका अधिकाऱ्याकडे तीन ते चार विभागांची जबाबदारी देण्यात आली. त्यात त्यांचा बहुतांश वेळ प्रशासकीय बैठकांमध्ये खर्च होतो. नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी या अधिकाऱ्यांकडे वेळच नाही. त्यामुळे आरोग्य, नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, तसेच विद्युत विभागाची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.

आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या आयुक्तपदावरही प्रभारीराज सुरू झाले आहे. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त असल्याने मनपाला आणखी काही महिने तरी नवीन आयुक्त मिळणार नाहीत. त्यामुळे इतर पदांप्रमाणे अायुक्तपदही आता रिक्त राहणार आहे. महापालिकेत सध्या हजार २६६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात वर्ग एकमध्ये आठ, तर दोनमध्ये २८ अधिकारी आहेत. वर्ग तीनमध्ये ४५७, तर चारमध्ये हजार ७७३ कर्मचारी आहेत. शहराचे क्षेत्रफळ सुमारे साडेचार लाख लोकसंख्येच्या तुलनेत मनपाचे हे मनुष्यबळ तोकडे आहे. त्याचा परिणाम नागरी सेवेवर होत आहे. नवीन नळकनेक्शन, दुरुस्ती, बांधकाम परवानगी, जन्म-मृत्यू दाखला, साफसफाई आदी कामांसाठी नागरिकांना कार्यालयात खेट्या माराव्या लागतात. परंतु आधीच अतिरिक्त कामाने त्रस्त झालेले अधिकारी नागरिकांना सरळ टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात.

एखाद्या नागरिकाने उलट जाब विचारलाच, तर हे अधिकारी आपल्याकडे असलेल्या कामांचा पाढाच वाचतात. त्यामुळे जाब विचारणाराही आपोआप शांत होतो. असा प्रकार मनपाच्या मुख्य कार्यालयासह सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये सुरू आहे. कोणत्या विभागाचा चार्ज कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, हेदेखील कळणे कठीण झाले आहे. समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना प्रथम संबंधित अधिकारी शोधावा लागतो. त्यानंतर अधिकाऱ्याच्या सवडीनुसार आपली समस्या मांडली, तरी आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडत नाही. शेवटी खेट्या मारून थकलेले नागरिक गप्प राहणेच पसंत करत आहेत. मनपाचा आकृतिबंधाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मनपा प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. परंतु शासनाकडून या प्रस्तावाकडे दुर्लक्ष होत आहे.

अाकृतिबंधास मंजुरी मिळाली, तर नवीन अधिकारी कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आकृतिबंधास मंजुरी नसल्याने मनपाला प्रभारी बिगारी कर्मचाऱ्यांवरच कामकाज चालवावे लागत आहे. शहरातील ३४ प्रभागांचा विस्तार मोठा अाहे. त्या तुलनेत प्रत्येक प्रभागासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ मनपाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकांचीदेखील मोठी गैरसोय होत आहे. चांगली सेवा देणे हे मनपाचे कर्तव्य आहे. मनपाने आपले कर्तव्य पार पाडावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
कामाचे योग्य नियोजन
महापालिकेतकर्मचाऱ्यांची कमतरता असली, तरी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामाचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यास लवकरच मंजुरी मिळेल. त्यानंतरच मनपातील मनुष्यबळाचा प्रश्न कायमचा सुटेल.'' अभिषेककळमकर, महापौर
बातम्या आणखी आहेत...