आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांत धावणार नवीन दहा बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरकरांच्या सेवेसाठी घेण्यात आलेल्या आणखी दहा शहर बस येत्या पाच दिवसांत शहरातील रस्त्यांवरून धावणार आहेत. कागदपत्रांची पूर्तता होताच या बस सुरू करण्यात येतील, अशी माहिती अभिकर्ता संस्थेचे धनंजय गाडे यांनी सोमवारी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

अभिकर्ता संस्था यशवंत ऑटोमार्फत शहरात बससेवा सुरू आहे. सुरुवातीला ११ बस सुरू केल्याने ही सेवा कमी पडत होती. त्यामुळे अभिकर्ता संस्थेने आणखी दहा बस खरेदी केल्या आहेत. येत्या पाच दिवसांनंतर शहरात २१ बस धावणार असल्याची माहिती गाडे यांनी दिली. विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा वरदान ठरली अाहे. नगरकरांनी बससेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आणखी बस खरेदी करण्याचा निर्णय अभिकर्ता संस्थेने घेतला. यापूर्वीची अभिकर्ता संस्था प्रसन्ना पर्पलने महापालिका प्रवाशांना वेठीस धरत बससेवा बंद केली होती. तेव्हापासून शहरातील अनधिकृत रिक्षाचालकांनी प्रवाशांची अार्थिक लूट केली होती. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवाशांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले. बंद झालेली ही सेवा पाच महिन्यांपूर्वी पुन्हा नव्याने सुरू झाली. आता नगरकरांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अभिकर्ता संस्था प्रयत्न करत आहे. नवीन दहा बस खरेदी केल्याने शहरात आता २१ बस धावणार आहेत. त्यामुळे प्रवासी फे-या तर वाढणार आहेत, शिवाय ज्या भागात बस जात नव्हती, तेथे बससेवा सुरू होणार आहे.

कागदपत्रांची पूर्तता
पूर्वी ११ बस सुरू होत्या. आता आणखी दहा बस खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांच्या कागदपत्राची पूर्तता झाली आहे. केवळ एनओसीचे काम बाकी आहे. चार-पाच दिवसांत हे कामही पूर्ण होईल. त्यानंतर सर्व बस सुरू होतील. धनंजय गाडे, संचालक,अभिकर्ता संस्था.
बातम्या आणखी आहेत...