आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दहा प्रवासी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
नगर - नगर-औरंगाबादमहामार्गावरील घोडेगाव शिवारात मंगळवारी दुपारी चालकाचा ताबा सुटल्याने ही खासगी आरामबस शेतात जाऊन उलटली. या अपघातात आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यात दाेन लहान मुले महिलांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. नगरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भावना ट्रॅव्हल्स (एमएच १४ बीए ९३१२) बसचा अपघात झाला. घोडेगाव येथील शिक्षक दिगंबर सोनवणे, चालक अली शेख ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. 

सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शिंदे, शिंगणापूर येथील सहायक पोलिस निरीक्षक राऊत, पोलिस उपनिरीक्षक ससाणे त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. बसचालकास ताब्यात घेत पोलिसांनी पुढील कार्यवाही केली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दोन क्रेनच्या साहाय्याने बस अपघातस्थळावरून हटवण्यात आली. 
 
बातम्या आणखी आहेत...