आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांच्या मुलीने चोरले 19 लाख रुपये; शिर्डीत विवाह सोहळ्यातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - जळगाव येथील व्यापार्‍यांच्या लग्नसोहळय़ातून दहा वर्षे वयाच्या मुलीने सोने-चांदीच्या दागिन्यांसह 19 लाखांचा ऐवज लंपास केला. सिल्व्हर ओक लॉन्स या लग्नसोहळय़ाच्या ठिकाणाशेजारील घरात दागिन्यांची बॅग ठेवलेली होती. घागरा घातलेल्या या मुलीला वधूपक्षाकडील महिलेने बघितले, परंतु ती घाईघाईने निघून गेली, असे व्यापारी अजय हिरालाल राकेचा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बॅगेत 13.5 लाख रोख, 1.5 लाख रुपये किमतीचा डायमंड हार, 3.6 लाख रुपये किमतीचे 24 तोळे सोने असा 19 लाखांचा ऐवज होता, असे फिर्यादीत नमूद आहे. वधूच्या दागिन्यांसह केटर्सचे पैसे एका बॅगमध्ये आणले होते. थांबण्यासाठी दिलेल्या खोल्यांपैकी एका खोलीत सोफ्याजवळ आपण ही बॅग ठेवली होती, असे राकेचा यांनी म्हटले आहे.