आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या छेडछाडीवरून पाथर्डी शहरात तणाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुलीच्या छेडछाडीवरून पाथर्डी शहरात मंगळवारी दोन गटांत दगडफेक झाली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत तणाव होता. घटनेनंतर शीघ्रकृती दलाचे पथक दाखल झाल्याने तणाव काही प्रमाणात निवळला. शहरातील रावल गल्ली भागात एका तरूणाने मुलीची छेड काढली. त्यावरून दोन गटांत दगडफेक झाली. दगडफेकीत कुणीही जखमी झाले नाही. तथापि, दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर रावल गल्लीतील संतप्त महिलांनी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला.

छेडछाड करणार्‍या तरूणाला बारा तासांत अटक करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक अशोक आमले यांनी दिल्यानंतर जमाव माघारी आला. दरम्यान, सायंकाळी प्रार्थनास्थळावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या प्रकरणातील आरोपींना अटक करा, अशी मागणी करीत नागरिकांनी चिंचपूर रस्त्यावर आंदोलन करत पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्याची तयारी केली. मात्र, ही माहिती कळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन निरीक्षक आमले यांनी दिल्यानंतर नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला. उशिरापर्यंत तणावाची स्थिती होती.