आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tenth Examination : English Paper's Copy Rain ; Squad Ignore The City

दहावीची परीक्षा : इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस; भरारी पथकांचे शहराकडे दुर्लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - इंग्रजी विषयाच्या पेपरला गुरूवारी शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला. विशेष म्हणजे शहरासाठी एकही भरारी पथक नसल्याने विद्यार्थ्यांनी बिनधास्तपणे कॉप्या केल्या. मात्र, त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून पेपर देणा-यांचा हिरमोड झाला.

तारकपूर, तसेच कोर्टगल्ली परिसरातील काही परीक्षा केंद्रांमध्ये सुरूवातीपासून कॉप्यांचा पुरवठा सुरू होता. विशेष म्हणजे सुपरवायझर व पाणी देणारे कर्मचारी कॉपीसाठी मदत करताना दिसत होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने शिक्षणाधिकारी शिवनाथ मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यासाठी सात भरारी पथके नेमली असून ही सर्व पथके विविध तालुक्यांमध्ये पाठवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. शहरासाठी एकही भरारी पथक नसल्याचे त्यांनी मान्य केले. ज्या ठिकाणी कॉप्यांचे प्रकार सुरू आहेत, अशा ठिकाणी गट विकास अधिका-यांना पाठवण्याची व्यवस्था करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, पुणे मंडळाचे सहसचिव अनिल गुंजाळ यांनी शिक्षणाधिका-यांकडून कॉपीप्रकरणी अहवाल मागवणार असल्याचे सांगितले. भरारी पथके वाढवण्याची व्यवस्था करणार असल्याचेही ते म्हणाले.