आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी परीक्षार्थींची संख्या निम्म्याहून अधिक घटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शासकीय शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने दरवर्षी शिक्षक अतिरिक्त ठरतात. या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न असल्याने नवीन भरतीलाही मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे डीएड आणि टीईटी करून शिक्षकाची नोकरी मिळणेच आता दुरापास्त झाले आहे.
परिणामी टीईटी परीक्षार्थींच्या संख्येत २०१३ च्या तुलनेत पेपर पेपर साठी २२ हजार ८७० एवढी घट झाली आहे.

डीएड, बीएड पदवीप्राप्त उमेदवारांना शिक्षक म्हणून नोकरीत संधी मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दरवर्षी या परीक्षेसाठी अर्ज मागवले जातात. यावर्षीच्या टीईटी परीक्षेसाठी भरलेले ऑनलाइन अर्ज सादर करण्याची १९ नोव्हेंबर ही शेवटची मुदत होती. २०१३ मध्ये नगर जिल्ह्यातून टीईटी परीक्षेसाठी ३५ हजार ८०० विद्यार्थी बसले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ही संख्या घटली. जानेवारी २०१५ मध्ये पुन्हा टीईटी परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात आले. त्यावेळी अवघ्या १२ हजार ९३० विद्यार्थ्यांनीच परीक्षेसाठी अर्ज केले. शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळणे दुरापास्त झाल्यानेच या परीक्षेकडे पाठ फिरवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

बारावीनंतर डीएडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी नव्वदीच्या दशकात अध्यापक महाविद्यालयांबाहेर उमेदवारांच्या रांगा लागत होत्या. डीएडनंतर हमखास नोकरी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा कलही या अभ्यासक्रमाकडे अधिक होता.
परंतु पटसंख्येच्या आधारावर शिक्षक निश्चिती सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण झाल्याने पालकांनी खासगी शाळांत विद्यार्थी प्रवेशाला प्राधान्य दिले. परिणामी जिल्हा परिषदांच्या शाळेतील पटसंख्या वर्षानुवर्षे कमी होत अाहे. पटसंख्या घसरल्याने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना रिक्त जागांवर समायोजित केले जाते. त्यामुळे नव्याने भरतीला गेल्या काही वर्षांपासून मुहूर्त मिळाला नाही. अनेक तरुण डीएड अभ्यासक्रम पूर्ण करूनही कुठेतरी विनाअनुदानित शाळेत तुटपुंज्या पगारावर काम करतात, तर काहींनी हे क्षेत्रच सोडून दुसऱ्या क्षेत्रात करिअरच्या संधी निवडल्या.

शिक्षक म्हणून नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने अध्यापक विद्यालयांना उतरती कळा लागली आहे. शासनाने आता शिक्षक पात्रता परीक्षा प्राथमिक उच्च प्राथमिक नोकरीसाठी अनिवार्य केली आहे. त्यानुसार झालेल्या डिसेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत टीईटीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेतली असता, या परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते. २०१३ च्या तुलनेत २०१५ मध्ये जवळपास २२ हजार ८७० परीक्षार्थींमध्ये घट झाली आहे. याचाही विचार शासन स्तरावर होणे अपेक्षित आहे.
२४८०१
सन २०१४
३५८००
सन २०१३

१६ जानेवारीला परीक्षा
२०१३च्या तुलनेत परीक्षार्थींची संख्या घटली असल्याने परीक्षा केंद्रांची संख्या कमी होईल. परंतु आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. १६ जानेवारीला टीईटी परीक्षा होणार आहे.'' अशोककडूस, जिल्हाशिक्षणाधिकारी.
१२९३०
सन २०१५

शासनाने जमवला गल्ला
टीईटीपरीक्षेसाठी प्रतिविद्यार्थी परीक्षा एकसाठी प्रवर्गानुसार २५० ते ५००, तर परीक्षा दोनसाठी ४०० ते ८०० रुपये परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागले. तीन वर्षांत या माध्यमातून एकट्या नगर जिल्ह्यातून कोटीवर रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.

पाच वर्षे भरतीच नाही
२०१०मधील सीईटीधारक पात्र शिक्षकांना प्रत्यक्ष नियुक्ती मिळवण्यासाठी २०१५ पर्यंत वाट पहावी लागली. राज्यभरात पटसंख्या घटत असल्याने जागा रिक्त होत नाही. त्याचाही परिणाम भरतीवर झाला आहे. २०१० नंतर आतापर्यंत शिक्षक भरतीच झाली नाही.

बेरोजगारांमध्ये निराशाच
टीईटीकरूनही नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे तरुणवर्ग डीएड, बीएडऐवजी स्पर्धा परीक्षांकडे वळत आहे. टीईटी झाल्यानंतरही नोकरी केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.'' रावसाहेबरोहोकले, शिक्षक.