आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटी: चाचणी उत्तीर्ण व्हा, पण नोकरी मागू नका, भावी शिक्षकांची परवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोधेगाव - स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थेंतर्गत शिक्षण सेवक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. या क्षेत्रातील रिक्त जागांची संख्या समोर नसताना भावी शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, शिक्षक पात्रता परीक्षेसह ही चाचणी उत्तीर्ण होणे गरजेचे केले आहे. मात्र, या बाबी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे नोकरीसाठी स्थानिक अथवा खासगी संस्थेमध्ये अर्ज करावा लागेल.

परंतु ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला मात्र थेट नोकरीचा हक्क मिळणार नसल्याने भावी शिक्षकांना भुर्दंड सोसत नोकरीचा पल्ला गाठावा लागत आहे.
शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी अडथळा शर्यत अजूनही सुरूच आहे. केंद्र शासनाच्या बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अन्वये प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व्यावसायिक अार्हतेसह शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली. या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवणारा उमेदवार पात्र असून त्याची मुदत सात वर्षे राहील, असे घोषित करण्यात आले. बी. ए., एम. ए. अशा शैक्षणिक पात्रतेबरोबर डी. टीएड, बी. एड. या व्यावसायिक पदव्या प्राप्त केल्यानंतर टीईटी अन् आता अभियोग्यता चाचणी. नोकरीची हमी नसताना आम्ही आयुष्यभर अशा परीक्षाच द्यायच्या का? असा सवाल परीक्षार्थींतून केला जात आहे. या चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने शहरातील खासगी क्लासचालकांत मात्र चढाओढ लागली आहे.

सव्वा महिन्यावर आलेल्या परीक्षेकरिता ते हजार रुपये शुल्क घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. आजतागायत तीन-चार वेळेस घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल अवघा चार टक्केच लागला. यामध्ये आपली पात्रता सिद्ध करणाऱ्या परीक्षार्थींच्या पदरात अद्याप काहीच पडले नसताना आता नव्याने ही परीक्षा घेण्याचे शासनाने जाहीर केले. दरम्यान, खासगी व्यवस्थापनाच्या शाळेत शिक्षक भरतीद्वारे होत असलेला ‘बाजार’ पाहता ही परीक्षा योग्यच असल्याने त्यातून गुणवत्ताशील उमेदवार शिक्षण क्षेत्रात येतील आणि खासगी संस्थेतून भरती प्रक्रियेत होणारा गैरप्रकार थांबणार आहे. ही चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार नसून या चाचणीत उत्तम गुण मिळवलेल्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी शैक्षणिक संस्था यांनी जाहीर केलेल्या जाहिरातीस अनुसरून संबंधितांकडे अर्ज करावा लागेल.

अशा अर्ज केलेल्या उमेदवारातून त्या व्यवस्थापनाला अधिकतम गुण मिळवणाऱ्यांस सेवेत सामावून घ्यावे लागेल. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर उमेदवार पंधरा दिवसांत हजर झाल्यास त्याचा हक्क संपुष्टात येईल. या चाचणी परीक्षेतून एका उमेदवाराला पाच वेळेस गुण वाढवण्याची संधी असेल. या परीक्षेतून शिक्षकांची अभियोग्यता अन् बुद्धिमत्ता तपासली जाणार आहे. प्राथमिक करिता डी. एड. पात्रताधारकांना सर्व विषय शिकवावे लागतात. मात्र, माध्यमिक उच्च माध्यमिक पातळीवर एका विशिष्ट विषयाचे वेगवेगळे शिक्षक असताना अशा प्रवर्गासाठी विषय ज्ञान कसे पडताळून पाहणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. परंतु सरकारकडून त्यांची परवड होते.
 
रिक्त जागांचा अभाव
नोकरीतीलशिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संच मान्यतेनंतर किती पदे रिक्त, किती अतिरिक्त याबाबत निश्चित संख्या समोर येते. शासनाकडून शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत निश्चित अशी कुठलीही घोषणा केली नसताना जाहीर केलेल्या अशा परीक्षेतून काय साध्य होणार? परीक्षा शुल्कच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भावी शिक्षकांचा रोष कमी करण्याकरिता दाखवलेले गाजर असल्याचा आरोप उमेदवारांतून केला जात आहे.
 
भरतीबाबत अद्याप ठोस पाऊल नाही
शिक्षक भरती करिताशासनाने केंद्रीय भरती पूर्व निवड परीक्षा २०१० ला घेतली. त्यानंतर मात्र भरतीबाबत शासनाकडून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. मध्यंतरी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली, तरीही हातात अद्यापपर्यंत काही पडलेले नाही. शासनाकडून अशा परीक्षेबाबत सातत्य नसून गेल्या सात वर्षांपासून याबाबत ठोस भूमिका घेण्यात आल्याने डीएड होऊन टीईटी उत्तीर्ण भावी शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
- अविनाश परांडे, भावी शिक्षक.
बातम्या आणखी आहेत...