नगर- नांदेडयेथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर माधवराव ठाणेकर यांच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी रवी चलास भोसले यास अटक करण्यासत नगर पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी आरोपीला राहत्या घराजवळ सापळा लावून जेरबंद केले. भोसले हा ठाणेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी असून यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी बुधवारी दिली.
नांदेड येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर माधवराव ठाणेकर (४५) यांचा मागील वर्षी जामखेड- बीड रस्त्यावर धारदार हत्यारांनी खून झाला होता. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले होते. परंतु मुख्य आरोपी रवी चलास भोसले (गणेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याला जेरबंद करण्यात यश येत नव्हते. भोसलेला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेकदा सापळा लावला. परंतु प्रत्येकवेळी त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली. दोनवेळा तर त्याने पोलिसांवरच हल्ला चढवला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटोळे यांच्या पथकाला भोसले त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. पाटोळे त्यांच्या पथकाने बुधवारी पहाटेपासूनच भोसले याच्या घराजवळ सापळा लावला. सकाळी सात वाजता भोसले याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात नगरसह, पुणे सोलापूर जिल्ह्यात खून, दरोडा, रस्तालूट यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत.
भोसले याला पुढील कारवाईसाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यासह इतर सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक पाटोळे यांच्यासह राजकुमार हिंगोले, संजयकुमार सोने, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, विनाद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे, सुरज वाबळे, प्रवीण जगताप, मधुकर शिंदे, मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, उमेश खेडकर, संदीप पवार यांनी ही कामगिरी केली.
भोसलेत्याच्या साथीदाराने ठाणेकर यांचा सप्टेंबर २०१४ रोजी तीक्ष्ण हत्याराने खून केला. आरोपींनी ठाणेकर यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना जामखेडजवळ अडवले. गुप्तीसारख्या धारदार हत्याराने त्यांच्या छातीवर वार करण्यात आले. त्यांच्या अंगावरील लाख ५९ हजार ३०० रुपयांचे दागिने, रोख रक्कम, मोबाइल इन्होव्हा गाडी घेऊन आरोपींनी पोबारा केला होता. भोसलेला पकडण्यात वर्षानंतर यश मिळाले.
भोसलेवरखून, दरोडा, तसेच रस्तालुटीचे दहा-बारा गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही तो मराठी चित्रपटांना फायनान्स करत होता. एका गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या पोस्टरवर तर भोसले याचे चक्क निर्माता म्हणून नाव झळकले होते. यासंदर्भात पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांनी मात्र बोलण्यास नकार दिला. आरोपीला ताब्यात घेतले आहे, तपासात अनेक बाबी समोर येतील, असे त्यांनी सांगितले.