आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाव आधुनिकतेचे, पण सुविधांची वानवा, नगरच्या रेल्वेस्थानकावरील स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दररोज किमान ३२ गाड्यांची ये-जा, लष्कराचे महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे गजबजलेले रेल्वेस्थानक असतानाही नगरच्या रेल्वेस्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नवे चकचकीत प्रतीक्षालय बांधले, पण त्याला अनेक वेळा कुलूप असल्याने प्रवाशांना दुर्गंधी डासांचा सामना करत प्लॅटफॉर्मवरील बाकड्यांवर बसून गाडीची प्रतीक्षा करावी लागते. रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा प्रवाशांना सेवा देण्याचा सध्याचा ‘उत्साह’ त्यांच्या एकूण कामाची पद्धत पाहता या घोषणा कागदावरच राहण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेशी काही देणे-घेणे नसल्यासारखी येथील स्थिती आहे. स्वच्छतागृह आहे, पण त्यातील बेसिनला पाणीच नसते. थंड पाण्याची व्यवस्था आहे, पण पाणी कधीच थंड मिळत नाही. अशा मूलभूत सुविधांच्या कमतरतेबरोबरच आरक्षण, तत्काळ आरक्षणाच्या सुविधांबाबतही एजंटगिरीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आता रेल्वेस्थानकावर वाय-फाय सुविधा रेल्वे प्रशासनाद्वारे पुरवल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नगरच्या स्थानकावर पायाभूत सुविधांची मारामार आहे. कारण आहे त्या सुविधाही व्यवस्थितपणे पुरवण्यात रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्वारस्य नाही. दोन महिन्यांपूर्वी या रेल्वेस्थानकावरील वीज दररोज सायंकाळी गायब व्हायची. त्यावेळेस नेमकी गाडी अाल्यावर प्रवाशांना आपला डबा शोधताना प्रचंड धावपळ करावी लागत होती. आता हा प्रश्न सुटला असला, तरी इतर समस्या कायम आहेत.
सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान नवीन प्रतीक्षालयाला कुलूप होते. तेथील कर्मचाऱ्याने आपल्याकडे चावी नसल्याचे प्रवाशांना सांगितले. वास्तविक पाहता जेथे २४ तास किमान ३२ गाड्यांची ये-जा सुरू असते, अशा स्थानकावरील प्रतीक्षालय कायम उघडे असायला हवे आहे. पण, बेफिकिरीमुळे तसे होत नाही.
‘तत्काळ’कायम ‘वेटिंग’वरच
‘दिव्यमराठी’ने रेल्वेस्थानकामधील आरक्षणातील एजंटगिरीचा पर्दाफाश केला होता. तत्काळ आरक्षणासाठी रेल्वे प्रशासनाने नियम कडक केले. मात्र, एजंटांनी त्यावरही तोडगा काढला आहे. ते आता तिकिटाऐवजी आरक्षण खिडकीवर अनधिकृतरीत्या नंबर लावून, ते नंबरचे फॉर्मच गरजू प्रवाशांना विकत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या टीमने पहाटे चार वाजता केलेल्या पाहणीत उघड झाले होते. आताही त्यात बदल झालेला नाही. यात बुकिंग करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांंचाही सहभाग अाहे. त्यामुळे प्रवाशांना कायम तत्काळचे तिकीट ‘वेटिंग’चेच मिळते.
जेथे बुकिंग होते, अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर खिडकीवर कोणते लोक नेहमी येतात, हे स्पष्ट होईल. तसेच प्रत्येक गोष्ट कॅमेरे टिपणार असल्याने परिणामी तिकिटांच्या बुकिंगमधील काळ्याबाजाराला आळा बसू शकतो.
अचूक माहिती मिळण्यात अडचणी
रेल्वेप्रशासन आधुनिकतेचा कितीही दावा करत असले, तरी प्रवाशाला आपले आरक्षण निश्चित झाले, की नाही याची माहिती मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानकावर चौकशीची खिडकी असते, पण तेथे पूर्णवेळ थांबणारा कर्मचारी नसतो. असलाच तर तो ‘१३९’ क्रमांकावरून माहिती घ्या, असा सल्ला देतो. ‘इंटरनेट स्लो आहे’, ‘गाडीची लिंक मिळत नाही,’

अशी कारणे सांगितली जातात
पूर्वी प्रत्येक स्थानकावर चौकशीची यंत्रणा होती. तेथील दूरध्वनी उचलला जात नसल्याच्या प्रचंड तक्रारी होत्या. त्यानंतर रेल्वेने १३९ क्रमांकावरून चौकशीची सेवा उपलब्ध करून दिली. दोन रुपये प्रतिमिनिट असा या सेवेचा दर आहे. या क्रमांकावरून आरक्षण निश्चित (कन्फर्म) झाले, की नाही, हे पाहण्याचीही सुविधा आहे. मात्र, त्या मेनूपर्यंत जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. तो सहन करून तिकिटावरील पीएनआर क्रमांक डायल केल्यावर, ‘आपण दिलेली माहिती चुकीची आहे,’ असे ऐकावे लागते. त्यामुळे हवी ती माहिती मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करावा लागतो. याच क्रमांकावरून गाडीच्या आगमन-प्रस्थानाची माहिती मिळते. मात्र, रेल्वे आणि नियोजित वेळेचे फारसे जमत नाही.
माहिती घेता स्थानकावर जावे आणि गाडी दोन-तीन तास उशिराने येणार असल्याची महिती तेथे मिळावी, असे नेहमी घडते. अनेकदा ‘१३९’ क्रमांकावरील माहितीवर अवलंबून राहिल्याने गाडी चुकल्याचा अनेकांना अनुभव आला आहे. त्यामुळे ही सेवा असूनही प्रवाशांना गाडीच्या नियोजित वेळेस स्थानकावर यावे लागते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दंडात्मक कारवाई आवश्यक...सुविधांसाठी पाठपुरावा सुरूच...