आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार करून तरुणीची निर्घृण हत्या; नगर जिल्‍ह्यातील कोपरगाव येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- तालुक्यातील दहिगांव बोलका येथील ३० वर्षीय तरुणीसोबत प्रेमसबंध निर्माण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केला. ही घटना शुकवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, आरोपीचा मृतदेह संवत्सर रेल्वे पुलाखाली आढळला. ही हत्या की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. 


दशरथवाडी संवत्सर गोदावरी डावा कालव्यावरील पुलाखाली शुक्रवारी ३० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला. मृत युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी संदीप कांबळे याचे मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याने तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारले. व त्यानंतर स्वत: रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली. फिर्यादीवरुन कोपरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रेल्वे गँगमन मोहम्मद मक्सुद आलम याने दिलेल्या खबरीवरुन संदीप कांबळे याचा मृतदेह संवत्सर रेल्वे पुलाखाली आढळला. त्याच्या डोक्यास मागील बाजूस मार लागून मोठी जखम होती.

बातम्या आणखी आहेत...