आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा जिंकण्यासाठी संघर्ष गरजेचा : मनोज देशमुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले : कोणतीही स्पर्धा जिंकायची असेल, तर संघर्ष आवश्यक आहे. संघर्ष मोठा असेल, तर यश मोठे मिळेल. विजेते स्पर्धक आणि सहभागी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद सहभाग आहे, असे प्रतिपादन अकोल्याचे तहसीलदार मनोज देशमुख यांनी केले. 

अभिनव शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी तहसीलदार देशमुख बोलत होते. याप्रसंगी अकोलेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
यावेळी नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, नगरसेविका स्वाती शेणकर, संगीता शेटे, विमल भोईर शबाना शेख, मुकुंद रासने, सुजित नवले, स्वामी अख्तर शेख, सुरेश गडाख, विकास शेटे, अशोक वाकचौरे, सतीश वाकचौरे, दिनेश जोरवर, राजेंद्र मालुंजकर, सतीश चोथवे, अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विक्रम नवले, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, सहसचिव रामकृष्ण नवले, सदस्य ल. का. नवले, प्रा. जयश्री देशमुख आदी उपस्थित होते. 

एकूण ९५० स्पर्धक मॅरेथॉनमध्ये धावले. या स्पर्धेत शालेय मुले गटातील (इयत्ता वी ते १० वी) ज्ञानेश्वर विद्यालयाचा बाबासाहेब गुंजाळ याने प्रथम, तर पिंपळगाव नाकविंदा येथील अरुण संपत मधे याने द्वितीय, तर भंडारदरा येथील दिलीप तुंबडे याने तृतीय क्रमांक पटकावला. शालेय मुली (इयत्ता वी ते १० वी) स्पर्धेत अकलापूर येथील स्वप्नाली भागा घोडे हिने प्रथम, लिंगदेव येथील न्यू हायस्कूलची काजल कानवडे हिने द्वितीय, तर अकलापूर येथील स्वाती किसन पवार हिने तृतीय क्रमांक पटकावला.
 
मुलांच्या खुल्या गटातील स्पर्धेत अकलापूर येथील शासकीय आश्रमशाळेचा प्रसाद गोरक्ष माळी याने प्रथम क्रमांक, नाशिक येथील गोरक्षनाथ पंजा पोपेरे याने द्वितीय, तर पाथर्डी येथील किशोर विठ्ठल मरकड याने तृतीय क्रमांक पटकावला. 

मुलींच्या खुल्या गटात पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी विद्यालय पिंपळगावची रखमा गोविंद पथवे हिने प्रथम क्रमांक, अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाची स्वाती भीमा घोडे हिने द्वितीय, तर अकोले येथील आर्य अॅकॅडमीची मयुरी संजय भोर हिने तृतीय क्रमांक पटकावला. 

विजेत्यांचा रोख रक्कम, ट्रॉफीने सन्मान 
विजेत्यांना अतिथी प्रायोजकांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. अनिल बेंद्रे हेमंत मंडलिक यांनी केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रस्तावना स्वागत संस्थेच्या कॅम्पस डायरेक्टर प्रा. जयश्री देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन आभार प्रा. कुसुम वाकचौरे हेमंत मंडलिक यांनी मानले.