आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात घोषणाबाजीचे युग; गोरगरिबांची परवडच , अरूंधती रॉय यांनी व्यक्त केली खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतदेश हा राज्यघटनेची चौकट स्वातंत्र्य, समता, बंधुता न्याय या चतु:सुत्रीवर चालतो. देशात सध्या घोषणाबाजीचे युग अवतरले असून समाजातील गोरगरिबांची परवड वाढली आहे, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती राॅय यांनी व्यक्त केली. स्नेहालय येथे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या सांगड कार्यकर्ता संमेलनाच्या समारोप प्रसंगी मंगळवारी त्या बोलत होत्या. संमेलनाचे संयोजक नंदू माधव, उल्का महाजन, विविध सामाजिक चळवळीतील ५०० युवक कार्यकर्ते, १५० ज्येष्ठ कार्यकर्ते, नागरिक यावेळी उपस्थित होते. रॉय म्हणाल्या, एकीकडे घोषणाबाजी वाढली असली तरी सद्यस्थितीत समाजातील गोरगरिब वंचितच ठेवला जात आहे. देशात कोणाचेही सरकार आले तरी नागरिकांचा सशक्त दबावगट असल्याशिवाय सामाजिक न्याय कोणालाही मिळणार नाही.
देशातील साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी सर्वसामान्य जनतेने सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित येऊन आपापल्या परीने योगदान देण्याची आवश्यकता आहे. अधिकार हक्क मिळवण्यासाठी सत्तेचा लगाम आपल्या हाती ठेवला पाहिजे. त्यासाठी माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करण्याची गरज आहे.
अनेकांच्या प्रयत्न आंदोलनांमुळे माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आला. त्याचा सकारात्मक कामासाठी उपयोग वाढला पाहिजे. सरकारला प्रश्न विचारण्याची तसेच आपले विचार मांडण्याची हिंमत आपल्यास असली पाहिजे. चुकीच्या बाबींना विरोध करण्यासोबतच अन्यायाविरूद्ध सामुहिक आवाज उठवता अाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. "हम अपने अधिकार जानते है, नही किसीसे भिख मांगते' "ये देश हमारे आपका, नही किसीके बाप का' या क्रांतिगीताने त्यांनी भाषणाचा समारोप केला. तत्पूर्वी "सांगडचे प्रतिरुप' या कार्यक्रमात संमेलनाचे संयोजक नंदू माधव यांनी हे संमेलन कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार यापुडे सुरूच राहणार असल्याचे सांगितले. त्यासाठी गटातील कार्यकर्त्यांची पुढील महिन्यात पुणे किंवा मुंबईत बैठक होणार असल्याचे ते म्हणाले. निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, विद्रोही चळवळीचे धनाजी गुरव, अॅड. सरोदे, उल्का महाजन, संदीप बर्वे, गाैतम कांबळे, अश्विनी सातव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यापूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला अभिनेत्री वीणा जामगावकर हिने बोलते केले. सांगड महासंमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना अरुंधती रॉय.

पर्यावरण मानवी मूल्य संवर्धन आवश्यक
सध्यादेशात पर्यावरणीय घटक मानवी मुल्यांची काळजी घेता बड्या भांडवलदारांना स्वैरपणे उद्योगांचे परवाने दिले जात आहे. पर्यावरण मानवी मूल्यांचे संरक्षण हीच विकासाची पूर्वअट असायला हवी, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगड संमेलनात व्यक्त केले. अॅड. असिम सरोदे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.